आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विश्वास नांगरे पाटील यांच्या पुस्तकाच्या बनावट प्रती पकडल्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील लिखित ‘मन में है विश्वास’ या लोकप्रिय पुस्तकाच्या बनावट प्रती पोलिसांनी मुंबई, पुणे आणि लोणावळ्यात पकडल्या आहेत. या पुस्तकाच्या पायोरेटेड प्रती तयार करून विकल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून दोन जणांना ताब्यात घेतले आहे.

राजहंसचे संचालक डॉ. सदानंद बोरसे म्हणाले ‘बाजारात लोकप्रिय असलेल्या पुस्तकाच्या पायोरेटेड (बनावट) प्रतींची विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यामुळे राजहंसतर्फे अमोल महादम यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यावर तपास करून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ४५ प्रती जप्त केल्या. रामगणेश गजाधर पाल (३२) आणि शैलेंद्र इंद्रलाल विश्वकर्मा (२८, दोघेही रा. रा. मोहन चाळ, कोथरूड पुणे) अशी त्यांची नावे आहेत. पोलिस अधीक्षक जय जाधव, पोलिस निरीक्षक रामचंद्र जाधव त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.
या पुस्तकाच्या अजून प्रती उपलब्ध आहेत का, मूळ सूत्रधार कोण असावा, याचा शोध पोलिस घेत आहेत.
बातम्या आणखी आहेत...