आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे: पिझ्झा डिलिव्हरी बॉयने दोन अल्पवयीन मुलींशी केले लैंगिक चाळे!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- आयटी क्षेत्रातील व उच्चाभ्रू लोकांचा परिसर म्हणून ख्याती मिळवलेल्या पिंपळे सौदागरमधील एका सोसायटीत राहणा-या दोन अल्पवयीन मुलींशी 'डॉमिनोज'च्या पिझ्झा डिलिव्हरी बॉयने अश्लील चाळे केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी निखिल प्रकाश शिंदे ( वय-23, रा. वैदू वस्ती, पिंपळे गुरव) या पिझ्झा डिलिव्हरी बॉयला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी पिंपळे सौदागर पोलीस चौकीत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे सौदागर परिसरातील एका सोसायटीमध्ये हा डिलिव्हरी बॉय पिझ्झा देण्यासाठी आला होता. त्यावेळी त्या सोसायटीच्या खाली व बाहेर काही मुले खेळत होती. त्यातील दोन मुलींना त्याने कशाच्या तरी बहाण्याने लिफ्टमध्ये घेतले आणि त्यांच्याशी लैंगिक चाळे केले.
घटनेनंतर मुली भेदरलेल्या अवस्थेत घरी गेल्या व सायंकाळी वडील घरी आल्यावर त्यांना सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर मुलींचे वडील व त्यांचे नातेवाईक मुलींना घेऊन डॉमिनोजच्या शॉपमध्ये गेले. तेथे मुलींनी आरोपीस ओळखले. त्यानंतर त्यांनी आरोपीस पकडून पिंपळे सौदागर पोलीस चौकीत घेऊन गेले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलिस निरीक्षक मनोहर सोनवणे तपास करीत आहेत.
बातम्या आणखी आहेत...