आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Planchette Issue In Pune, Dr. Narendra Dabholkar Murder Case

प्लँचेटची सखोल चौकशी करा, अन्यथा राज्यभर आंदोलन कर; अंनिसचा इशारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणी पुणे पोलिसांनी प्लॅँचेटचा वापर केल्याचे नुकतेच उघडकीस आले आहे. प्लॅँचेट प्रकरणाची सखोल चौकशी करून तपशीलवार माहिती द्यावी. तसेच तपास 31 जुलैपर्यंत पूर्ण न केल्यास अंनिसतर्फे एक ऑगस्टपासून राज्यभर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिला. या वेळी डॉ. हमीद दाभोलकर व मिलिंद देशमुख उपस्थित होते.

डॉ. हमीद म्हणाले, पोलिसांनी प्लँचेटचा वापर केल्याप्रकरणी जादूटोणाविरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांत तक्रार केली आहे. जादूटोणाविरोधी कायद्याअंतर्गत संबंधित निरीक्षकाला दक्षता अधिकारी म्हणून कुठल्याही प्रकरणात तपासाचे अधिकार देणे, हे अत्यंत खेदजनक असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.