आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असमतोल: प्राणवायू देण्यात झाडांचा हात आखडता

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- ऑक्सिजन अर्थात प्राणवायू पुरवणारे वनस्पतींचे विश्व भविष्यात त्याचे उत्सर्जन करण्यास अक्षम ठरणार असल्याचे वनस्पतिशास्त्रज्ञ डॉ. रुस्तुम तांबोळी यांचे संशोधन आहे. कण्हेरीच्या झाडांवरील दोन वर्षांच्या अभ्यासानंतर झाडे ऑक्सिजन देणे बंद करत असल्याचा निष्कर्ष आहे. कोरेगावातील रयत शिक्षण संस्थेच्या कॉलेजचे प्राध्यापक तांबोळी यांनी यूजीसी पुरस्कृत प्रकल्पांतर्गत एनएच 4 वरील वाहन प्रदूषणाचा कण्हेरीवर होणाºया परिणामांचा अभ्यास केला.
कण्हेरींवर संशोधन
पुणे- बंगळुरू महामार्गावरील दुभाजकांवरील कण्हेरीच्या झाडांवर संशोधन करण्यात आले. महामार्गावर प्रचंड वाहतूक असते. त्यामुळे कार्बन डायॉक्साइड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर असे विषारी वायू बाहेर टाकले जातात. कण्हेरीच्या पानांवर माायक्रोस्कोपिक कॅमेºयांच्या आधारे संशोधन करण्यात आले.

वनस्पती ऑक्सिजन स्वत:साठी ठेवताहेत
० प्रदूषणामुळे कण्हेरीची कार्बन डायॉक्साइड शोषून ऑक्सिजन सोडण्याची प्रक्रियाच बदलते आहे.
० प्रकाश संश्लेषणातून ऑक्सिजन सोडण्यासाठीच्या स्टोमॅटल कॅव्हिटीज प्रदूषणाने बंद होत आहेत.
० स्वत:जवळील ऑक्सिजन या वनस्पती स्वत:साठीच राखून ठेवत असल्याचे आढळून आले आहे.
० पानांमध्ये निरुपयोगी घटकही साठत (वेस्ट डिपॉझिट्स) चालले आहेत, असे आढळले आहे.
० वनस्पती बदल कायमस्वरूपी स्वीकारत आहेत. त्यांची टेक्सोनॉमिक पोझिशन बदलते आहे.

वृक्षारोपण हाच उपाय
> मोठ्या संख्येने वृक्ष लावणे आणि त्यांचे संवर्धन करणे
> प्रदूषणमुक्त अशा स्वरूपाच्या वाहनांची निर्मिती करणे.
> आठवड्यातून एक दिवस ‘नो व्हेइकल डे’ उपक्रम राबवणे.