आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pm Modi May Do Public Rally At Karad Former Cm's Assembly

पृथ्वीबाबांना घेरण्याचा भाजपचा डाव; कराडमध्ये मोदींच्या सभेसाठी प्रयत्न

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत मंचावर जाण्यास नकार दिल्यानंतर चव्हाण विरूद्ध मोदी असा मध्यंतरी चांगलाच रंगला होता. आता पृथ्वीराज चव्हाण विधानसभेच्या रिंगणात उभे असल्याने त्यांच्याविरोधात रणशिंग फुंकण्यासाठी स्थानिक नेत्यांनी कराडमध्ये मोदींची सभा घेण्याची विनंती केली आहे. मोदींनी त्याला अद्याप हिरवा कंदील दिला नसला करी मोदी 13 तारखेला कराडमध्ये सभा घेऊ शकतात असे बोलले जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांच्या बारामती या बालेकिल्ल्यात जोरदार प्रचारसभा घेतल्यानंतर प्रदेश भाजप नेत्यांनी मोदींनी कराडमध्ये जाऊन एक दणकेबाज सभा घ्यावी या मताचे आहेत. मात्र, मोदींचा प्रचारदौरा यापूर्वीच निश्चित करण्यात आला आहे. याचबरोबर मागील आठवड्यापासून दररोजच 4-5 सभा घेऊन आवाज गेला आहे. त्यातच त्यांना हरयाणामध्येही प्रचार करायचा आहे. नियोजित प्रचारदौ-यानुसार मोदी 12 व 13 ऑक्टोबरला महाराष्ट्रात आहेत. या दरम्यान, कराडमध्ये सभा घ्यावी असे प्रदेश नेत्यांना वाटत आहे. 13 ऑक्टोबरला मोदींची रत्नागिरीमध्ये सभा आहे. त्याचआधी किंवा नंतर मोदींनी कराडमध्ये सभा घ्यावी असे भाजपने मोदींना प्रस्ताव दिला आहे. मोदींनी अद्याप होकार कळविला असला तरी नकारही कळविला नाही. त्यामुळे शेवटच्या दिवशी कराडमध्ये सभा घेतल्यास मोठा परिणाम होईल असा भाजपचा होरा आहे.
मोदींचा होकार मिळेल या आशेने भाजपने कराडमध्ये सभेची तयारी ठेवली आहे. दरम्यान, पृथ्वीराज चव्हाणांना मोदींच्या सभेची कुणकुण लागल्याने त्यांनी आपला तळ मतदारसंघात ठोकला आहे. कराडमधील ग्रामीण भागात चव्हाण प्रचारकामात सध्या व्यस्त आहेत. चव्हाणांनी मोदींच्या सभेचा धसका घेतल्याचे चित्र आहे. आता मोदी कराडमध्ये सभा घेणार की नाही याकडे लक्ष आहे.