आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PM Modi Praise Work Of Missionaies During Baramati Visit

बारामती दौरा: हिंदुत्ववादी नरेंद्र मोदी पाहणार मिशन-यांचा कार्यगौरव!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - संघ परिवार आणि भाजपच्या अनेक नेत्यांची हिंदुत्ववाद आणि ‘घरवापसी'बद्दलची वक्तव्ये वादग्रस्त ठरत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबद्दल अद्याप चकारदेखील काढलेला नाही. याचे उट्टेच जणू शनिवारी शरद पवारांच्या बारामतीत निघणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चार महिन्यांपूर्वीचा पहिला बारामती दौरा शरद पवार यांच्याविरोधात प्रचार करण्यासाठी केला होता. शनिवारी (14 फेब्रुवारी) बारामतीत दुस-यांदा येणारे मोदी पवारांच्या नियोजनानुसार बारामतीची सैर करतील.

या दौ-यात मोदींना अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टबद्दलची 40 मिनिटांची डॉक्युमेंट्री दाखवली जाणार आहे. सन 1968 च्या सुमारास ऑस्ट्रेलियातून दोन मिशनरी नन्स बारामती भागात आल्या होत्या. त्यांच्या पुढाकारानेच अप्पासाहेब आणि शरद या पवार बंधूंनी या ट्रस्टची स्थापना केल्याचे सांगितले जाते. या दोन नन्सनी केलेल्या कार्याची माहिती डॉक्युमेंट्रीत प्रामुख्याने आहे. 1972 च्या दुष्काळात या नन्सनी ‘फूड फॉर वर्क' या संकल्पनेखाली स्थानिक दुष्काळग्रस्तांना काम दिले व त्या बदल्यात त्यांना धान्य दिले होते. पुढे याच नन्सच्या माध्यमातून मिळालेल्या आर्थिक मदतीतून ट्रस्टच्या कामाला गती मिळाली. मिशनरी कार्याचा हा गौरव मोदींना शांतपणे पाहावा लागेल.
पुढे वाचा, शनिवारी सकाळी चाकण येथील जी. ई. कंपनीचा कार्यक्रम उरकून मोदी हेलिकॉप्टरने ११ वाजून ५ मिनिटांनी बारामतीत उतरतील