आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pm Narendra Modi At Baramati On 14 Or 19 Feb 2015

पवार-मोदींच्या प्रेमाला बहर येणार \'व्हॅलेंटाईन डे\'च्या मुहूर्तावर!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या 14 फेब्रुवारी रोजी बारामतीत येत आहे. शरद पवार यांच्या विद्या प्रतिष्ठान या शैक्षणिक संकुलात आयोजित कार्यक्रमाला ते हजेरी लावणार आहेत.
विधानसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान मोदींनी शरद पवारांवर कडवट टीका करताना काका-पुतण्याच्या गुलामगिरीतून बारामतीकरांना मुक्त करा असे विधान केले होते. हे विधान पवारांच्या जिव्हारी लागले होते. मात्र, पवारांनी त्याबाबत अधिक भाष्य न करता थेट मोदींनाच बारामतीचा विकास दाखविण्यासाठी निमंत्रण धाडले होते. त्यानुसार मोदींनी पवारांच्या निमंत्रणाचा स्वीकार केला असून, व्हॅलेटाईन डेच्या दिवशी म्हणजेच 14 फेब्रुवारीला मोदी बारामतीत असणार आहेत. याचेच निमित्त साधून राज्य सरकारने एक बारामतीत एक कृषि प्रदर्शन आयोजित केले आहे. त्या कार्यक्रमालाही मोदी उपस्थित राहणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑक्टोबर महिन्यात बारामतीत जाहीर सभा घेऊन पवार काका-पुतण्यावर जोरदार टीका केली होती. येथील लोक मागील 50 वर्षापासून पवारांच्या गुलामगिरीत असून त्यातून मुक्ती हवी असेल तर भाजपला साथ द्या असे आवाहन केले होते. मात्र, परिपक्व राजकारणी म्हणून देशात ओळख असलेल्या पवारांनी मोदींवर टीका न करता त्यांना थेट बारामती व परिसराचा विकास पाहण्यासाठी निमंत्रण दिले आहे. मात्र, निवडणुकादरम्यान होणारे आरोप-प्रत्यारोप विसरून मोदींनी पवारांचे निमंत्रण स्वीकारत 14 व 19 फेब्रुवारी अशा दोन तारखा दिल्या होत्या. त्यानुसार 14 तारखेवर पीएमओकडून शिक्कामोर्तब झाल्याचे समजते आहे.
या दौ-यादरम्यान मोदींना बारामती व परिसरात केलेली विविध विकासकामे, महिला सक्षमीकरणासाठी केलेले काम, औद्योगिक, दुग्धविकास, शेतक-यांसाठी व कृषिसेवेच्या संदर्भात उभारण्यात आलेले विविध प्रकल्पांची माहिती देण्यात येणार आहे. तसेच आपल्या विद्या प्रतिष्ठान या शैक्षणिक संकुलात सर्व अभ्यासक्रमांसह इतर शैक्षणिक सोयी- सुविधा कशा उपलब्ध करून दिल्या आहेत याची माहिती देणार आहेत. बारामतीतील ग्रामीण भागात संगणकाची गोडी लागावी यासाठी फिरते संगणक शाळा व त्याद्वारे चालविण्यात येणारे विविध उपक्रम व त्याचा सामान्यांना झालेला फायदा याची सविस्तर माहिती मोदींना देण्यात येणार आहे.
पवारांवरील प्रेमापोटीच 14 फेब्रुवारी तारीख- 19 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत असणार आहेत. शिवजयंतीदिवशी अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार असल्याचे कळते. त्यामुळे 14 तारखेला काही अडचण आल्यास मोदी 19 फेब्रुवारीला बारामतीत येणार असल्याचे कळते. मात्र, मोदींनी पवारांवरील प्रेमासाठी स्वतंत्र वेळ काढण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे 14 फेब्रुवारीलाच मोदी बारामतीत येणार असल्याचे समजते आहे.
पुढेे वाचा, मोदी-पवार राजकीय विरोधक असले तरी त्यांच्यात आहे एक समान दुवा...