आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pm Narendra Modi At Pune On 3rd Jan, Discussing With Bankers

नरेंद्र मोदी बँकर्ससोबत आज मुंबई ते पुणे बसप्रवास करणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- देशातील टॉप बँकर्ससोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी बसमध्ये प्रवास करणार आहेत. मोदींनीच त्यासाठी पुढाकार घेतला आहे. या सर्व व्यक्ती व्हॉल्व्हो बसमध्ये मुंबईहून पुण्याला जातील. पुण्यात मोदींसोबत ते बँकिंग क्षेत्रातील सुधारणांवर चर्चा करतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 3 जानेवारी रोजी पुण्यात सरकारी बँकांच्या प्रमुखांना भेटून त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. बँकींग क्षेत्र आणि तंत्र मजबूत करण्यासाठी कोणत्या सुधारणा करता येतील यावर मोदी बँकर्सशी चर्चा करतील. अर्थमंत्री अरुण जेटली हे ही त्यांच्यासमवेत उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
पुण्यात 2 व 3 जानेवारी रोजी सरकारी बँका आर्थिक संस्थांच्या प्रमुखांची बैठक होणार आहे. या उपक्रमाला 'ज्ञान संगम' असे नाव देण्यात आले आहे. बैठकीचा उद्देश सरकारी बँकांची दक्षता, भांडवली गरज, जोखीम आकलन, कर्ज वसुली आदी क्षेत्रात सुधारणा आणणे हा आहे.

चर्चासत्राचा समारोप तीन जानेवारीला मोदींच्या उपस्थितीत होणार आहे. या वेळी मोदी बँकांच्या प्रमुखांशी चर्चा करतील. या दोन दिवशीय बैठकीत बँकींग क्षेत्रातील सुधारणांसाठी 'अॅक्शन प्लॅन' आराखडा तयार केला जाणार असून त्यात बँका सरकारच्या प्राथमिकतेच्या मुद्यांचा समावेश असेल. बैठकीत सरकारी बँकांचे पुनर्स्थापना पुनरूज्जीवन, प्रत्यक्ष लाभ, प्राथमिक क्षेत्राला कर्जपुरवठा, व्याजात सवलती, मनुष्यबळासारख्या मुद्यांवर चर्चा होईल.