आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pm Narendra Modi Campaigning For Criminal Bjp Candidate

सक्तमजुरीची शिक्षा झालेल्या उमेदवारासाठी मोदींनी घेतली सभा!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- काँग्रेस पक्षावर भ्रष्टाचाराचे आरोप करून केंद्रात सत्तेत आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र आता महाराष्ट्रात सत्ता आणण्यासाठी गुन्हेगारी व भ्रष्टाचारी नेत्यांचा प्रचार करताना दिसत आहेत. तब्बल 12 गुन्हे दाखल असलेले व एका खटल्यात तुरुंगवासासह एका वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा झालेले भाजपचे राहुरीतील आमदार शिवाजी कर्डिले यांच्यासाठी मोदींनी आज राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या मैदानावर सभा घेतली.
अनेक खटले नावावर असलेल्या व सक्तमजुरी झालेल्या कर्डिले यांच्यासाठी पंतप्रधानांनीच प्रचार सभा घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. चार दिवसापूर्वी मोदींनी धुळे येथे भाजपचे उमेदवार व तेलगी घोटळयाप्रकरणी आरोप झालेले अनिल गोटेंसाठी प्रचारसभा घेतली होती. त्यावेळी टीका झाली असतानाही भाजपने व पंतप्रधानांनी पुन्हा एकदा गुन्हेगारी उमेदवाराच्या प्रचार सभेला जाण्यास पसंती दिली आहे. यावरून भाजपला कोणत्याही स्थितीत सत्ता हवी आहे हे स्पष्ट होत आहे. तसेच सत्ता आणण्यासाठी आकडेच उपयोगाचे असतात यावर भाजपचा अढळ विश्वास बसू लागला आहे. नैतिकच्या गप्पा मारत केंद्रात सत्तेवर आलेल्या भाजपचा तीन-चार महिन्यांतच दुसरा रंग दाखवू लागला आहे.
अहमदनगरमधील अशोक लांडे खून प्रकरणी कर्डिले आरोपी आहेत. हा खटला सध्या नाशिक सेशन कोर्टात सुरु आहे. लांडे खून प्रकरणात कर्डिले यांच्यासह काँग्रेसचे माजी महापौर संदीप कोतकरसह त्यांचे दोन भाऊ, वडील तसेच काँग्रेसचा निलंबित शहर जिल्हाध्यक्ष भानुदास कोतकर व इतर 12 आरोपी आहेत. कोतकर व कर्डिले एकमेंकांचे नातेवाईक आहेत. राजकीय संघर्षातूनच लांडेंचा खून केल्याचा कर्डिले-कोतकर यांच्यावर आरोप आहेत.
पुढे वाचा, राहुरीतील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले...