आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pm Narendra Modi Reached In Pune, Towords The Chaken & Baramati

PHOTOS: पवारांचा अन् माझा मार्ग वेगळा, पण ध्येय एकच देशाचा विकास- नरेंद्र मोदी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बारामती- शरद पवार आणि माझे राजकारणातील मार्ग वेगळे आहेत. तरीही आमचे ध्येय एकच आहे ते म्हणजे देशाचा विकास. त्यामुळेच राजकीय विचार वेगळे असले तरी आम्ही एकत्र येतो कारण आपली राष्ट्रनिती महत्त्वाची आहे. शरद पवार अनुभवी नेते आहेत. त्यांच्यात माझ्यात संवाद आहे. आमच्यात महिन्यातून दोन-तीनचा विचारमंथन होते. त्यांच्यासारख्या नेत्याचे मार्गदर्शन माझ्यासारख्याने जरूर घेतले पाहिजे असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पवारांच्या दृरदूष्टीचे कौतुक केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दुपारी साडेआकराच्या सुमारास नरेंद्र मोदी यांचे चाकणहून बारामतीत आगमन झाले. त्यानंतर पंतप्रधानांनी सर्वप्रथम विद्या प्रतिष्ठानमधील शैक्षणिक संकुलाला भेट दिली. त्यानंतर मोदींनी या शैक्षिणक संकुलातील इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या इमारतीचे उद्घाटन केले. तसेच संपूर्ण शैक्षणिक संकुलाची पाहणी केली. याच संकुलात शरद पवारांना मिळालेल्या भेटवस्तूंच्या संग्राहलय आहे त्याची पाहणी मोदींनी केली. पवारांची कन्या सुप्रिया सुळे यांनी मोदींना संग्राहलयाची माहिती दिली. त्यानंतर मोदींनी भिगवण रस्त्याने माळेगावकडे प्रयाण केले. तेथे सर्वप्रथम अप्पासाहेब पवार सभागृहाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर कृषी विज्ञान केंद्राची पाहणी केली व तेथीलच सेंटर फॉर एक्सलन्स इमारतीचे भूमीपूजन केले. त्यानंतर दुपारी 1 ते 2 या वेळेत मोदींनी शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन केले.

दुपारी अडीच्या सुमारास शरद पवार यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनासाठी सर्व प्रमुख पाहुणे रवाना झाले. पंतप्रधान मोदी यांच्यासमवेत राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह, खासदार प्रफुल्ल पटेल, राज्याचे कृषिमंत्री एकनाथ खडसे, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, अजित पवार, सुप्रिया सुळे आदी नेते उपस्थित होते.
बारामतीतील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणांचा सारांश
मीडियातल्या आमच्या मित्रांसाठी आज विशेष दिवस आहे. कारण मी शरद पवारांच्या बारामतीत आलो आहे. आता ते शोधतील की मोदी आधी काय बोलले होते आणि आज इथे पुन्हा आल्यावर काय बोलले. लोकशाहीचं हेच सौंदर्य आहे. लोकशाही नेहमी दोन रुळांवर चालते. एक रुळ असतो वादाचा आणि दुसरा संवादाचा. वाद आणि संवादाच्या या दोन रुळांवरूनच लोकशाही पुढे जात असते. आम्ही राजकारणात आहोत, दोन वेगवेगळ्या पक्षांत आहोत. पण एका गोष्टीवर आमचा विश्वास आहे की, पक्षापेक्षा कधीही मोठा देश असतो. राजनीतीपेक्षा राष्ट्रनीती महत्त्वाची असते. दोन वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांची भेट ही आपल्याकडे खूप मोठी बातमी होते. खरं तर ही प्रक्रिया नेहमी व्हायला हवी. विकासासाठी विचारविनिमय हा व्हायला हवाच. यात सत्ताधाऱ्यांची जबाबदारी मोठी असते. माझी जबाबदारी ही म्हणूनच मोठी आहे. मी पुढे येत शरदरावांना विचारायला हवं की, काय करावं. तुमचा अनुभव मोठा आहे, सांगा अमूक एक परिस्थितीत मी काय करायला हवं. मी नेहमीच या विचारानं चालत आलो आहे. मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना त्यांना गुजरातला बोलावलं होतो, याची शरदरावांनी आठवण सांगितली. पण खरं तर आम्ही काय केलंय हे दाखवण्यासाठी मी त्यांना बोलावलं नव्हतं. आम्ही काय केलंय ते त्यांनी बघावं आणि अजून काही राहिलंय का हे त्यांच्याकडून समजून घेण्यासाठी, शिकण्यासाठी मी त्यांना बोलावलं होतं...
हे तर झालं पूर्वीचं. पण आता मी पंतप्रधान असतानाही महिन्यातून 2-3 वेळा मी त्यांच्याशी बोललेलो नाही, असा एकही महिना गेलेला नाही. अनेक गोष्टींसाठी मी त्यांची मदत घेतो. राज्यातल्या अडचणींतूनही मार्ग काढायलाही पक्षीय भेदाभेद बाजूला ठेवून त्यांनी नेहमीच मदत केली आहे. याबद्दल मी त्यांचे येथे जाहीर आभार व्यक्त करतो आहे. इथून गेल्यावर आम्ही दोघेही एकमेकांविरोधात मसालेदार, झणझणीत टीकाही करू शकतो. ते राजकारण झालं. पण आमचा हेतू एकच आहे. देश पुढे जावा.
म. गांधींनी स्वातंत्र्यासाठी हजारो लाखो सैनिक तयार केले. जनशक्ती एकवटली. गरीबीपासून स्वातंत्र मिळवण्यासाठीही आपल्याला गरीबीमुक्ती मिळवून देतील, अशा लाखो सैनिकांची आवश्यकता आहे. त्यांनी गावोगाव विकासज्योत तेववावी. गरीबीमुक्तीच्या लढ्यातलं सगळ्यात मोठं क्षेत्र आहे शेती. शेतकरी खूप मेहनत करतो. तरी जगण्याच्या त्याच्या अपेक्षा पूर्ण झालेल्या नाहीत. त्यासाठी काय करावं, याच्या काही सूचना शरदरावांनी भाषणात केल्या आहेत. गेल्या 10 वर्षांतल्या काही अपुऱ्या राहिलेल्या गोष्टी बहुधा माझ्या हातून पूर्ण व्हायच्या आहेत.
कृषिविकासात आधुनिक तंत्रज्ञान आणावंच लागेल. त्यातूनच शेतीची प्रगती होईल आणि शेतकऱ्याचीही. सॉइल हेल्थकार्ड शेतकऱ्यांना देणारं गुजरात पहिलं राज्य होतं. त्याचा खूप मोठा फायदा तिथे शेतकऱ्यांना झाला. अजूनही होतो आहे. मी इथे प्रयोगशाळा पाहिल्या. 10, 11, 12 वी विद्यार्थ्यांना सॉइल टेस्टिगचं प्रशिक्षण द्यावं. शाळांच्या सुट्ट्यांत प्रयोगशाळा बंदच राहतात. प्रशिक्षित विद्यार्थ्यांनी सॉइल टेस्टिंग केलं, त्यासाठी प्रयोगशाळेत सामुग्री उपलब्ध करून दिली तर शेतकऱ्यांना फायदा होईल आणि शाळेलाही वाढीव उत्पन्न मिळेल.
एकरी पीक कसं वाढेल, हा मुद्दादेखील खूपच महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यादृष्टीनंही आपण प्रयत्न करायला हवे. शेताचं तळं झाल्याशिवाय शेतकऱ्याला समाधान मिळत नाही. अगदी उंचावर शेत असलं, तरी तिथेही पाणी साठून रहावं, यासाठी शेतकरी प्रयत्न करताना आपण पाहतो. आपण पाण्याचा खूपच अपव्यय केलाय. पिकांना खूप जास्त पाणी दिल्यानं फायदा होत नाही. गरज आहे ठिबक सिंचनाची. अगदी ऊसही ठिबक सिंचनाद्वारे होऊ शकतो, हे आपण पाहिलंय. बारामतीत आणि गुजरातमध्येही. जेनेटिक इंटरव्हेन्शनची मदत घेऊन आपण ऊस घेऊ शकतो. त्यातून चांगल्या प्रतीचा ऊस पिकवून शेतकऱ्याचं उत्पन्न वाढू शकतं. पण ऊस पिकवणाऱ्या शेतकऱ्यापासून ते साखर उद्योगातील प्रत्येक घटकाला ताकद देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ती ताकद मिळाली नाही, तर हा उद्योग संकटात येईल.
कृषी क्षेत्रात प्रगतीसाठी आधुनिक तंत्राचा वापर हवा. काटेकोरपणे पारखून घेतल्याशिवाय शेतकरी नवी गोष्ट स्वीकारत नाही. त्यासाठी कृषी विज्ञान केंद्रांची मदत होऊ शकते. कृषी क्षेत्रामध्ये व्हॅल्यू अॅडिशनवर भर हवा. त्याशिवाय शेतीला ताकद मिळणार नाही. व्हॅल्यू अॅडिशन सामान्य शेतकऱ्यापर्यंत जायला हवी. परिसाच्या स्पर्शानं लोखंडाचं सोनं होतं म्हणतात, असं मी ऐकलंय. परीस मी पाहिला नाही. पण पाणी हा परिसच. पाण्याच्या योग्य स्पर्शानं जमीन पिकाचं सोनं करेल. पाणी हा इश्वरी प्रसाद आहे. देवळातला प्रसाद चुकून खाली पडला तर त्याला नमस्कार करून आपण उचलतो. पाण्याचा प्रत्येक थेंबही तसाच प्रसाद आहे. एकही थेंब वाया जाऊ देणार नाही, असा विचार प्रत्येकानं करायला हवा. बारामतीत आपण पाहिलं, तर काय झालं आहे? अप्पासाहेबांच्या नेतृत्वाखाली जलसंस्कार झाले. आज इथली जमीन हिरवी दिसते कारण पाण्याच्या एकाही थेंबाचा अपव्यय होत नाही. हे इथल्या शेतकऱ्यांनी करून दाखवलंय.
पंतप्रधान सिंचन योजना त्याच हेतूनं आखण्यात आली आहे. पाण्याचा सदुपयोग, पर्जन्य जलसंधारण अशा गोष्टी साध्य करणं हा या योजनेचा उद्देश आहे. जितकं पाणी आपण वाचवू, भूगर्भातली पाण्याची पातळी वाढवू तितकी शेती आणि शेतकऱ्याची प्रगती होईल. येथील अनेक प्रकल्प मी पाहिले. बारामतीत येण्यासाठी शरदरावांनी आमंत्रण दिलं, त्यामुळेच हे शक्य होऊ शकलं. आमंत्रण दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.
पुढे वाचा, मोदींच्या आजच्या बारामती दौ-याविषयी...