आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बसने कॉलेजात जात होती Ex CM ची कन्या, पंतप्रधान मोदींनी दिली होती मंत्रिपदाची ऑफर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खासदार सुप्रिया सुळे - Divya Marathi
खासदार सुप्रिया सुळे
पुणे- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांना मंत्रिपदाची ऑफर दिली होती, असा खळबळजनक दावा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे. सुप्रिया सुळे यांना शरद पवार यांचा उत्तराधिकारी म्हणूनही पाहिले जाते. या अनुषंगाने आम्ही आपल्यासाठी सुप्रिया सुळे यांच्याशी संबंधित रंजक माहिती घेऊन आलो आहे.

सुप्रिया या एसटी बसने कॉलेजात ये-जा करत असत. पुण्‍यातून प्रकाशित होणार्‍या एका अग्रगण्‍य दैनिकात त्‍यांनी काही काळ नोकरीही केली. दरम्‍यान, त्‍यांची आणि सदानंद सुळे यांची ओळख झाली. ओळखीचे रुपांत प्रेमात झाले आणि पुढे दोघे लग्‍नाच्‍या बेडीत अडकले. सुप्रियाताई आणि सदानंद यांची पहिली भेट कुठे झाली, ताईंचे कॉलेज जीवन कसे होते, याची रंजक माहिती....

असे गेले सुप्रियांचे बालपण
शरद पवार यांचे प्रतिभाताईंशी लग्‍न ठरले, त्‍यावेळी त्‍यांनी एकच अट घातली होती. ती म्‍हणजे, आपल्याला एकाच मूल हवे. मग ते मुलगा असो की मुलगी. 30 जून 1969 रोजी पुणे येथे सुप्रियाताईंचा जन्म झाला. त्‍या एकुलती एक मुलगी आहे, असा विचारही न करता कुटुंब नियोजन करण्याचा धाडसी निर्णय घेतला. तब्बल 44 वर्षापूर्वी जेव्हा समाज एवढा पुढारलेला नसताना दोघांनी हा निर्णय घेतला होता. त्यातून दोघांच्या आधुनिक विचारांमधील परिपक्वता अधोरेखित होते. अशा उच्‍च विचारांच्‍या कुटुंबात सुप्रिया यांची जडणघडण झाली. त्‍यांना स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याच पूर्ण स्वातंत्र्य होते. अमुकच शिकले पाहिजे, तमुकच झाले पाहिजे, अशी कसलीही सक्ती कधीच झाली नाही. न शिक्षणाबाबत, न लग्नाबाबत. त्‍यांच्‍या आयुष्याचे सगळे निर्णय त्‍यांनीच घेतले आणि विशेष म्हणजे त्‍यांचे आईबाबा आणि कुटुंबीय पाठीशी भक्कमपणे उभे राहिले.

पुढील स्‍लाइड्सवर वाचा...
- कॉजेलमध्‍ये होत्‍या खूप लाजाळू, मुख्‍यमंत्र्यांची मुलगी असूनसुद्धा बसने करत ये-जा...
- सदानंदरावांशी कशी झाली ओळख..?
- बाळासाहेब ठाकरेंच्‍या आहेत भाचसून...
बातम्या आणखी आहेत...