आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुण्यात PMPML च्या कंत्राटी चालकांचा अचानक संप; मुढेंकडून प्रसन्न पर्पल बरोबरचा करार रद्द

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पीएमपीएमएलच्या खासगी बसचालकांच्या संपामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यातच पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी प्रसन्न पर्पलसोबतचा करार रद्द केला आहे.

 

चालकांना पुढे करुन प्रसन्न पर्पल ही कंपनी वेठीला धरत असल्याचा आरोप मुंढेंचा आहे. प्रसन्न पर्पल आणि पीएमपीएमएलमध्ये करार झाला आहे. ज्यानुसार चालकांचा पगार आणि बसेसची देखभाल करण्याची जबाबदारी प्रसन्न पर्पल कंपनीची आहे. मात्र, कंपनी करार पाळत नसल्यामुळे मुंढेंनी मागच्या दोन महिन्यांपासून चालकांचे पगार रोखून धरले आहेत. त्यामुळे आज सकाळपासून पीएमपीएमएलचे चालक संपावर गेले आहेत.

 

आता पुण्यातील पीएमपीएमएल बसवरील खासगी बस ड्रायव्हर्सनी सकाळपासून कामबंद केल्याने 200 बसची वाहतूक थांबली. यामध्ये कोथरुड डेपोच्या 110, तर पिंपरीच्या 90 बसवरील चालकांचा संपात सहभाग आहे.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...