आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पिंपरीत PMPMLच्या बस अडवल्या; 2 महिन्याचे वेतन थकल्याने प्रसन्न पर्पलचे कर्मचारी संतप्त

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 

पुणे- प्रसन्न पर्पलशी पीएमपीएमएलने संपुष्टात आणलेल्या कराराचे दुसऱ्या दिवशी ही पडसाद उमटले आहेत. पिंपरी चिंचवडमधील नेहरूनगर येथे प्रसन्न पर्पलच्या साडेसातशे चालकांनी अनेक बस रोखून धरल्या. अखेर पोलिस सुरक्षेत सर्व बस मार्गस्थ करण्यात आल्या. यावेळी काही चालकांनी पीएमपीएमएलचे अध्यक्ष तुकाराम मुंढेंवर नाराजी व्यक्त केली तर काहींनी प्रसन्न पर्पल कंपनीवर ही अविश्वास व्यक्त केला आहे.

 

तुकाराम मुंढेनी पी.एम.पी.एम.एल चा कारभार हाती घेतल्यानंतर शहरात जोरदार चर्चा आणि टीकास्र सुरु आहे.आज त्यातच भर पडत आता नवीन वाद मुंढे आणि पी.एम.पी.एम.एल ठेकेदारांमध्ये सुरु आहे. काल झालेल्या पी.एम.पी.एम.एल चालकांच्या आंदोलनानंतर तर आज प्रसन्न पर्पलच्या चालकानी पिंपरी चिंचवड़मध्ये बस रोखून धरल्या. पीएमपीएमएलने प्रसन्न पर्पल या कंपनीचा करार संपुष्टात आणल्याने बस चालक संतप्त झाले झाले आहेत.तर चालकाचे दोन महिन्याचा पगार थकीत आहे.

 

पी.एम.पी.एम.एल आणि प्रसन्न पर्पल या दोन कंपन्यांमधे करार होता.प्रसन्न पर्पल या ठेकेदाराकड़ून पी.एम.पी.एम.एल ला 200 ते 250 बसेस भाड़ेतत्वावर दिलेल्या आहेत, मात्र तुकाराम मुंढे यानी पदभार स्वीकारल्यानंतर हा करार काल रद्द करण्यात आला. त्यानंतर चालकानी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा पगार मिळत नसल्याने आज बस अडवल्या होत्या, संतप्त जमाव झाल्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी केली आणि पोलिसांच्या बंदोबस्तात बस बाहेर सोडण्यात आल्या.त्यानंतर प्रसन्न पर्पल कंपनीच्या पदाधिकाऱ्यांकडून लवकरच यावर मार्ग काढला जाईल.आणि सर्व चालकांचा पगार येत्या तीन दिवसात मिळेल, असे आश्वासन प्रसन्न पर्पलचे जनरल मॅनेजर बी. जी. सोनावणे यांच्याकडून देण्यात आले आहे.

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो 

बातम्या आणखी आहेत...