आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'पीएमआरडीए'चा मेट्रो स्टेशनचे ब्रँडिग करण्याचा निर्णय; इन्फोसिसचा सकारात्मक प्रतिसाद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) शिवाजीनगर ते हिंजवडी दरम्यानच्या मेट्रो स्टेशनचे ब्रँडिग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इन्फोसिस कंपनीने त्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
 
इन्फोसिसप्रमाणे हिंजवडीतील इतर प्रमुख आयटी कंपन्या आणि इतर नामांकित कंपन्यांनाही स्टेशनच्या ब्रँडिंगसाठी पत्र पाठविण्यात आले आहे. शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो ही प्रामुख्याने राजीव गांधी इन्फोटेक पार्कमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी असल्याने सकाळच्या वेळेत संबंधित कंपन्यांसाठीच मेट्रोच्या काही फेऱ्यांचे नियोजन करता येऊ शकणार आहे. त्यादृष्टीने, हिंजवडीतील कंपन्यांशी प्राथमिक चर्चा झाली असून, कंपनीच्या वेळेत अंशतः बदल करण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे.
बातम्या आणखी आहेत...