आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रसादातून विषबाधा, महिलेचा मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बारामती - शेजार्‍यानी रामेश्वर येथून आणलेल्या प्रसादातून विषबाधा झाल्याने एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला तर नऊ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेले रामेश्वरची यात्रा करून बाळासाहेब दादोबा खैरे (75) नुकतेच परतले होते. शनिवारी सायंकाळी त्यांनी मोठ्या भक्तिभावाने तेथून आणलेला प्रसाद वाटला. मात्र काही जणांना प्रसाद खाताच पोटात मळमळ होऊ लागली. त्यामुळे दहा जण बेशुद्ध पडले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान शकुंतला भानुदास शिंदे या महिलेचा मृत्यू झाला. त्यांची सून शीतल व नात श्रावणी याही प्रसाद खाल्ल्याने बेशुद्ध पडल्या होत्या. याप्रकरणी पोलिसांनी बाळासाहेब खैरे यांना ताब्यात घेतले आहे.