आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तो करत होता विद्यार्थिनीला अश्लील हावभाव, त्यानंतर पोलिसांनी त्याच्यासोबत केले असे काही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या तरुणांना महिला पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली आहे. आज दुपारी तळेगावच्या इंद्रायणी महाविद्यालयासमोर दुचाकीवर बसलेल्या तरुण विद्यार्थिनींला अश्लील हावभाव करत होता. त्याच दरम्यान दामिनी पथक हे गस्त घालत होते. विद्यार्थिनींची छेद काढत असल्याचे महिला पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर तरुणांना दामिनी पथकाच्या महिला पोलिसांनी खाक्या दाखवत धोपटले आहे.
 
ही घटना आज दुपारी महाविद्यालयासमोर घडली आहे. याप्रकरणी तरुणाला तळेगाव पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. महिला कॉन्स्टेबल प्रिया जाधव आणि कुंभार यांनी ही कामगिरी केली आहे. यातील महिला पोलिस कॉन्स्टेबल प्रिया जाधव यांनी या अगोदर पिरंगुट येथे बंदोबस्तावर असताना पर्यटकांना त्रास देणाऱ्या मद्यधुंद प्रेमी युगुलाला अद्दल घडवली होती.
बातम्या आणखी आहेत...