आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुण्यात अटक केलेला आरोपी गायब?; नातेवाईकांचा आरोप, पोलिस म्हणतात, न्यायालयीन कोठडीत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- तळेगाव पोलिसांनी अटक केलेला आरोपी गायब झाला असल्याचा आरोप आरोपींच्या नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणी नातेवाईकांनी वडगाव सत्र न्यायालयात दाद मागितली आहे. त्यानुसार वडगाव सत्र न्यायालयाने संबंधित अधिकाऱ्यांना मंगळवारी (दि.21) न्यायालयात हजर होण्यास सांगितले आहे. तर पोलिसांनी मात्र आरोपी गायब नसून तो न्यायालयीन कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

 

शाहरुख युसुफ शेख (वय 20 रा. ताजे, मावळ) यांनी वडगाव सत्र न्यायालयात तक्रारी अर्ज केला आहे. त्यात म्हटले आहे की, शाहरुख यांना 16 तारखेला दुपारी तळेगावचे पोलिस उपनिरीक्षक वैभव सोनवणे यांचा फोन आला व त्यांनी सांगितले की, तुझा भाऊ आयुब शेख हा आमच्या ताब्यात असून त्याला आम्ही पोलिस कर्मचाऱ्यांच्या रुमवर ठेवले आहे. उद्या तू व तुझे वडील आम्हाला पोलिस ठाण्यात येवून भेटा. दुसऱ्या दिवशी शाहरुख एकटा पोलिस ठाण्यात गेला असता सुरवातीस सोनवणे यांनी म्हटले की आमच्याकडे तुझा भाऊ नाही आम्ही तुलाच त्याला सोबत घेवून येण्यास सांगितले आहे. यावर शाहरुख याने सोनवणे यांना फोनची आठवण करु दिली असता सोनवणे आतल्या रुममध्ये गेले व त्यांनी बाहेर येवून सांगितले की, तुझा भाऊ आमच्याकडेच आहे व तो सुरक्षित असून तो पोलिस कर्मचाऱ्यांच्या रुममध्ये आहे. यावर शाहरुखने आयुबचा गुन्हा विचारला असता गुन्हा न सांगता दुसऱ्या दिवशी येण्यास सांगितले. 17 नोव्हेंबर रोजीही तळेगाव पोलिस ठाणे येथे गेले असता पोलिसांनी तीच उत्तरे दिली व आयुबला नातेवाईकांना भेटू दिले नाही व त्याचा गुन्हाही सांगितला नाही. याप्रकरणात पोलिस उपनिरीक्षक वैभव सोनवणे, देहुरोड उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणपतराव माडगुळर यांनी माझ्या भावाचा घातपात केला असल्याचा आरोप अर्जामध्ये केला आहे.

वरील अर्जातील आरोपावरुन वडगाव सत्र न्यायालयाने माडगुळकर व सौनवणे यांना 21 तारखेला न्यायालयात हजर राहून म्हणणे मांडण्याचे आदेश दिले आहेत.

 

याप्रकरणी वैभव सोनवणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावत सांगितले की, संबंधित आरोपीला काल (शनिवार) आम्ही एका घरफोडीच्या गुन्ह्यात अटक केले असून त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. तो सध्या येरवडा येथील कारागृहात आहे. आम्ही त्याच्या घरच्यांना केवळ त्याला अटक केली आहे असा निरोप देण्यासाठी फोन केला होता. हा आरोपी सराईत असून त्याच्यावर मुळशी येथील एका खूनाचाही आरोप होता. आम्ही हे न्यायालयात सिद्ध करु शकतो.या सर्व प्रकरणाचा आता येत्या मंगळवारी (दि.21) निकाल लागणार असून पोलिस व आयुबचे शेखचे नातेवाईक या दोघांच्याही बाजू यावेळी स्पष्ट होणार आहेत.

 
बातम्या आणखी आहेत...