आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शस्त्राच्या धाकाने राेकड लुटणारी टाेळी गजाअाड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - दुचाकीवर जाणाऱ्या व्यापाऱ्यावर शस्त्राने हल्ला करून त्याच्याकडील पाच लाख ३९ हजार रुपयांची रोकड लुटल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पाेलिसांनी अाठ जणांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यात चाेरलेली तीन लाख ४९ हजार रुपयांची राेकड, ८५ हजार रुपये किमतीच्या दाेन माेटारसायकल असा एकूण चार लाख ३४ हजार रुपयांचा ऐवज हस्तगत केल्याची माहिती गुन्हे शाखेचे पाेलिस उपअायुक्त पी.अार.पाटील यांनी दिली.
माेहसीन अम्मुन शेख, शामिक जाकीर शेख, इसरार सुभान शेख, जावेद माेती रहिमान, सूरज भगवान लिंबारे, समीर फरीद शेख, इम्रान इकबाल खान व रवी पारसराम रक्षे अशी अटक करण्यात अालेल्या अाराेपींची नावे अाहेत. याप्रकरणी श्रेयांश कीर्ती गांधी यांनी काेंढवा पाेलिसांकडे फिर्याद दाखल केली होती.