आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रात्रीच्या वेळी कारमध्ये बसून याठिकाणी येत होत्या मुली; उघड झाले हे सत्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोरेगांव पार्क लेन नं. 4 मध्ये हे सेक्स रॅकेट सुरु होते. - Divya Marathi
कोरेगांव पार्क लेन नं. 4 मध्ये हे सेक्स रॅकेट सुरु होते.
पुणे- कोरेगाव पार्क भागातील एका रो-हाऊसमध्ये रात्रीच्या वेळी कारमध्ये बसून नियमितपणे काही मुली येत होत्या. पोलिसांना ही बाब संशयास्पद वाटल्यावर या ठिकाणी छापा टाकण्यात आला. या छाप्यात या ठिकाणी हाय-प्रोफाईल सेक्स रॅकेट सुरु असल्याचे उघड झाले. पोलिसांनी या ठिकाणावरुन 9 मुलींची सुटका केली आहे. उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, दिल्ली आणि मुंबईतील या मुली आहेत. पोलिसांनी तिघांना अटक केली असून पिटा कायद्यातंर्गत 16 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

असा उघडकीस आला हा प्रकार
- पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाला कोरेगाव पार्क येथील लेन नं. 4 मधील दोन रो-हाऊसमध्ये सेक्स रॅकेट सुरु असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी दोन पथके बनवून या ठिकाणी छापा टाकला. पहिल्या छाप्यात 4 मुलीची सुटका करण्यात आली. या मुलींना देह विक्री करण्यात भाग पाडण्यात येत होते.
- दुसऱ्या छाप्यात 5 मुलींची सुटका करण्यात आली. दोन्ही रो-हाऊसमध्ये रात्रीच्या वेळी या मुलींना आणण्यात येत होते.
- पोलिसांनी सूरज गुप्ता, राजेंद्र यादव आणि त्यांच्या एका साथीदारास अटक केली आहे. 
- या मुलींची रवानगी मोहंमदवाडी येथील रेस्क्यू फाउंडेशनमध्ये करण्यात आली आहे.

भोसरीतही तीन मुलींची सुटका
- भोसरी ब्यूटी पार्लरच्या नावाखाली सेक्स रॅकेट सुरु होते. पोलिसांनी या ठिकाणावरुन तीन मुलींची सुटका केली आहे. 
बातम्या आणखी आहेत...