आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Police Handed Over 3860 Missing Childrens To Their Parents

४२९६ बेपत्ता मुलांच्या चेहऱ्यावर ‘मुस्कान’, ३८६० बालके पालकांच्या स्वाधीन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - महाराष्ट्र पाेलिस दलाने संवेदनशीलता जागृत ठेवत हरवलेल्या बालकांचा शाेध घेण्यासाठी जुलै २०१५ मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात ‘अाॅपरेशन मुस्कान’ माेहीम राबवली होती. या माेहिमेत राज्यातील ४६ पाेलिस घटक सहभागी झाले हाेते. यात एकूण ४२९६ बालकांचा शाेध घेण्यात अाला असून त्यात परराज्यांतील बालकांचाही समावेश आहे. या बालकांचे यथाेचित पुनर्वसन करण्यात अाले अाहे.

या माेहिमेत राज्यभरातून ४२९६ बालके शाेधण्यात आली असून त्यात हरवलेल्या बालकांच्या रेकाॅर्डवरील ७८५ बालके अाहेत. अभिलेखाव्यतिरिक्त ३५११ बालकांचा समावेश असून यात १३५५ मुलींचा समावेश अाहे, तर ३९ बालके परराज्यांतील अाहेत. एकूण सापडलेल्यांपैकी ३८६० बालके ही त्यांच्या पालकांकडे सुपूर्द करण्यात आली असून उर्वरित ४०३ बालके बालकल्याण समितीच्या ताब्यात देण्यात अाली अाहेत. मुंबई, नवी मुंबई, नागपूर, ठाणे, बुलडाणा, साेलापूर, नाशिक या शहरांत पाेलिसांकडून या माेहिमेत उल्लेखनीय कामगिरी करण्यात अाली अाहे.

अद्याप रेकाॅर्डवरील ५२८९ बालके सापडली असून त्यांच्या शाेधासाठी पाेलिसांकडून दुसऱ्या टप्प्यात प्रयत्न केले जात अाहेत.

अाॅपरेशन मुस्कान बालकांचे पुनर्वसन
घरातील वातावरणामुळे वैतागून घर साेडून गेलेली मुले, अपहरण झालेली मुले, घरातील बंधने अावडत नसल्यामुळे वैतागून बाहेर पडलेली मुले, बालमजुरी, प्रेम प्रकरणे, शहरातील अाकर्षण अादी कारणांमुळे पालकांपासून दुरावलेल्या सर्व बालकांना शाेधून त्यांच्या पालकांना सोपवण्यात आले आहे. भविष्यात बालकांसाठी सुरक्षित अाणि बालहक्काचे रक्षण करणारा समाज घडवणे हा अाॅपरेशन मुस्कानचा उद्देश अाहे.

मुस्कान माेहिमेतील निष्कर्ष
राज्यात हरवलेल्या बालकांसाठी सर्वत्र उपलब्ध हाेईल अशी एक स्वतंत्र हेल्पलाइन असणे अावश्यक अाहे. सापडलेल्या बालकांची माहिती अद्ययावत करणे गरजेचे अाहे. बालगृहे, स्वयंसेवी संस्था येथे दाखल असलेल्या मुलांच्या पालकांचा शाेध घेण्यासाठी संस्थांनी अधिक संवेदनशीलतेने काम करणे गरजेचे अाहे. बालकल्याण समिती, संरक्षण गृह, बालगृहे, एनजीअाे, पाेलिस यांच्यात लहान मुलांसंबंधी माहितीची देवाणघेवाण हाेणे व समन्वय असणे अावश्यक अाहे. भीक मागणारी टाेळी तसेच अनैतिक मानवी वाहतुकीतील गुन्हेगारी टाेळी यांच्यावर गुन्हे दाखल करून अाराेपींना अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्यात अाल्याची माहिती सीअायडीचे अपर पाेलिस महासंचालक संजय कुमार यांनी दिली.