आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Police Have No Clues Found In Dabholkar Murder Case

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दाभोलकर हत्याकांड: पथकांची संख्या बारावर; सुगावा मात्र लागेना !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- अंनिसचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या मारेक-यांचा शोध घेण्याच्या दृष्टीने तीन दिवसांनंतरही पोलिसांना ठोस माहिती मिळवण्यात यश आलेले नाही. त्यामुळे तपास पथकांची संख्या आठवरून बारापर्यंत वाढवण्यात आली आहे.

डॉ. दाभोलकरांच्या कार्याची राज्यस्तरीय व्याप्ती लक्षात घेऊन तपासासाठीचे पोलिस बळ वाढवण्यात आले आहे. बारा पथके विविध माहिती गोळा करत आहेत. या पथकांत 130 पोलिस असून त्यांचावर वरिष्ठांचे नियंत्रण आहे. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजमधून मारेक-यांपर्यंत पोहोचवू शकणारे एकही छायाचित्र उपलब्ध होऊ शकलेले नाही. या फुटेजमधील अस्पष्ट दृश्यांमुळे मारेकरी व त्यांनी वापरलेल्या वाहनासंबंधी नेमकी माहिती पोलिसांना मिळालेली नाही.