आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फलाट आणि रेल्वेमध्ये अडकली तरुणी, मृत्यूच्या दाढेतून कशी परतली, पाहा Video

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रेल्वे आणि फलाटामध्ये अडकलेली तरुणी. - Divya Marathi
रेल्वे आणि फलाटामध्ये अडकलेली तरुणी.
पुणे - धावत्या रेल्वेतून उतरण्याच्या प्रयत्नात अपघात झाल्याची कित्येक प्रकरणे आपण पाहत असतो. रेल्वेने प्रवास करणाऱ्यांना तर रोज असे अपघात पाहायला मिळतात. पण तरीही त्या अपघातातून शिकण्याऐवजी प्रवासी धावत्या रेल्वेतून उतरण्याचे जीवघेणे खेळ करत असतात. लोणावळ्यात नुकताच एक असाच प्रकार पाहायला मिळाला. रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे ही तरुणी अक्षरशः मृत्यूच्या दाढेतून परतली आहे.

रेल्वे स्टेशनवर असलेल्या सीसीटिव्ही फुटेजमधून ही घटना स्पष्टपणे समोर आली. काकीनाडा एक्सप्रेस या धावत्या रेल्वे गाडीतून उतरण्याचा प्रयत्न एका तरुणीने केला. तिच्याबरोबर एक तरुणही होता. उतरताना हीतरुणी खाली पडली आणि थेट रेल्वे आणि फलाटाच्या मधल्या गॅपमध्ये अडकली. रेल्वेमुळे ती काहीशी ओढलीही गेली. पण सुदैवाने खाली न जाता ती तेथेच अडकली. तेवढ्यात स्टेशनवरच्या एकापोलिसाने धावत जाऊन तिला वर ओढले आणि तिचे प्राण वाचले. त्याचवेळी तिच्यासोबतचा तरुणही तिच्यापासून काही अंतरावर पुढे पडला होता. पण तो पूर्णपणे फलाटावर होता. पवन तायडे असे या पोलिस कॉन्सटेबलचे नाव आहे. रेल्वे पुण्याहून मुंबईकडे जाताना हा प्रकार घडला.
सुदैवाने ही तरुणी पडली त्याच्या काही वेळेआधी खाली पडलेल्या एका वृद्धाला मदत करण्यासाठी हे पोलिस आणि इतर लोक मुलगी पडली त्याच्या जवळच जमलेले होते. त्यामुळे लगेचच ते तिला वाचवण्यासाठी धावले.
पुढील स्लाइड्सवर पाहा, नेमके काय घडले, अखेरच्या स्लाइडवर पाहा Video
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...