आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Police Not Give Information Of Dr. Dabholkar Killer

डॉ.दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी तपास कामाची माहिती देण्यास पोलिसांचा नकार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ.नरेंद्र दाभोलकर यांची हत्या होऊन 23 दिवसांचा कालावधी उलटला तरी पोलिसांना याप्रकरणात कोणतेही ठोस धागेदोरे मिळाले नाहीत. त्यामुळे प्रसारमाध्यमांना तपासाबाबत काय माहिती देणार? अशी गत पुणे पोलिसांची झाली असून त्यांनी तपासाबाबत माहिती देण्यास नकार दिला आहे. दाभोलकर यांचा हत्येचा तपास पुणे गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त राजेंद्र भामरे यांच्याकडे सोपावण्यात आला असून त्यांना याकामी गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त राजेश बनसोडे पूर्णवेळ सहकार्य करत आहेत. अधिका-यांच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी तसेच दैनंदिन आढावा गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त शहाजी सोळुंके घेत आहेत. वरिष्ठ अधिका-यांना तपास कामात मार्गदर्शन करण्यासाठी पोलिस आयुक्त गुलाब पोळ व सहायक पोलिस आयुक्त संजीवकुमार सिंघल कार्यरत आहेत. सुरुवातीला या अधिका-यांपैकी एकजण तपास कामाचा तपशील प्रसारमाध्यमांना देत होता. दरम्यान, दाभोलकरांचे मारेकरी कधी सापडतात यावर अनेक संघटनांनी प्रश्नचिन्ह उभे केले आहे.


तपासानंतर माध्यमांना माहिती
दाभोलकरांच्या हत्येला 23 दिवस उलटल्यानंतरही हत्या कोणत्या उद्देशाने झाली, हत्या करणारे कोण, हल्लेखोरांची दुचाकी अथवा शस्त्रे कुठे गेली, मारेक-यांनी कोणाच्या सांगण्यावरून सुपारी घेऊन ही हत्या घडवली. अशा आणि इतर कोणत्याच प्रश्नाबाबत पोलिसांकडे उत्तर नाही. त्यामुळे प्रसारमाध्यमांना टाळण्याचा प्रयत्न अधिकारी करत आहेत. हल्लेखोरांचा तपास लागल्यानंतर माध्यमांशी चर्चा केली जाईल, असे पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.