आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंदू राष्ट्र सेनेच्या मुंबईतील कार्यालयाची झडती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - फेसबुकवर महापुरुषांच्या बदनामी प्रकरणानंतर पुण्यातील हडपसर भागात मोहसीन शेख या तरुणाचा टोळक्याने केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी हिंदू राष्ट्र सेनेचा अध्यक्ष धनंजय देसाई याला अटक केली आहे. बुधवारी त्याची पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी.एन.वांबुरे यांनी त्याची 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

तपास अधिकारी सहायक पोलिस आयुक्त गोपीनाथ माने यांच्या पथकाने मुंबईतील विलेपार्ले येथील हिंदू राष्ट्र सेनेच्या मुख्य कार्यालयाची झडती घेतल्याचे न्यायालयात सांगितले आहे. पोलिसांनी या कार्यालयातून संगणकाची हार्डडिस्क, कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेर्‍याचा डीव्हीआर व त्याची हार्डडिस्क तसेच दाखल गुन्ह्याच्या तपास अनुषंगाने संशयित कॉम्पॅक्ट डिस्क, वेगवेगळ्या बॅँकांच्या स्लिपा, एटीएम डिपॉझिट स्लिपा, व्हिजिटिंग कार्ड जप्त केले आहेत. देसाई याचा जबाबही नोंदवण्यात आला असून त्याला न्यायालयीन कोठडीत
ठेवण्याची मागणी पोलिसांनी केली होती. त्यानुसार देसाईला येरवडा मध्यवर्ती कारागृहात हलविण्यात आले आहे.

छायाचित्र : हडपसर भागात मोहसीन शेख या तरुणाची टोळक्याने हत्या केल्यानंतर हिंदू राष्ट्र सेनेचा प्रमुख धनंजय देसाईला अटक करण्यात आली होती.