आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Police Recover Mobile Phone And Laptop From Thief

मुका-बहिरा चोरटा पोलिसांसमोर बोलू लागला, 35 मोबाइलसह, 7 लॅपटॉप जप्‍त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- आपण मुका-बहिरा असल्याचे भासवून मोबाइल आणि लॅपटॉपची चोरी करणा-याला चोरट्याला गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्याच्याकडून तब्‍बल 33 मोबाइलसह 7 लॅपटॉप, 1 डिजिटल कॅमेरा असा एकूण 6 लाख 14 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या घटनेमुळे सर्वसामान्‍यांच्‍या भुवया उंचावल्‍या आहेत.

या प्रकरणी अटक करण्‍यात आलेल्‍या आरोपीचे नाव आर. रमेश उर्फ एस. कुमार रामचंद्र आहे. हा 23 वर्षीय आरोपी मुळचा आंधप्रदेशमधील चिमूरचा असून सध्या तो देहूरोड परिसरात राहत असल्‍याची माहिती समोर आली. पोलिसांनी 15 ऑक्टोबरला संशयीत आरोपी म्‍हणून त्‍याला ताब्‍यात घेतले होते. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून तीन मोबाइल सापडले, त्‍यामुळे
पोलिसांचा संशय आणखी दाट झाला. त्‍यांनी चौकशीचे चक्रे फिरवली. त्यानंतर मुका असलेला हा चोरटा बोलू लागला नि पोलिस चक्रावून गेले. त्याच्याकडून पोलिसांनी 7 लॅपटॉप, 35 मोबाईल आणि 1 कॅमेरा असा एकूण 6 लाख 14 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पुढील स्‍लाइडवर वाचा, कशी करायचा चोरी, पाहा संबंधित फोटो..