आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवाहित पुरुषाबरोबर प्रेम करणेच पडले तिला महागात, तरुणीच्या हत्येचे गूढ उकलले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बोरिवलीतील संजय गांधी नॅशनल पार्कजवळ गळा चिरलेल्या अवस्थेत सापडलेल्या तरुणीच्या मृत्यूचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. लग्न कर, असा तगादा लावते म्हणून विवाहित प्रियकराने तिची हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. प्रवीण तळवटकर असे तिच्या प्रियकराचे नाव असून, त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गोरेगावातील तानाजीनगरमध्ये राहणा-या 27 वर्षीय सरला अहिरेची 27 नोव्हेंबरला रात्री गळा चिरून हत्या करण्यात आली होती.
याबाबतची घटना अशी की, सरला गोरेगावातील तानाजीनगरात बहिण व आईसोबत राहत होती. 27 नोव्हेंबर रोजी सरला नेहमीप्रमाणे सकाळी कामाला जाते म्हणून घराबाहेर पडली होती. मात्र, ती सायंकाळी परत घरी परतली नव्हती. त्यामुळे ती बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या आईने दिली होती. त्यानंतर दोन दिवसांनी सरलाचा गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला होता. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून कस्तुरबा मार्ग पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला होता. याचवेळी त्याच परिसरात राहल असलेल्या एका विवाहित मुलाबरोबर सरलाची मैत्री होती अशी माहिती मिळाली. त्यानंतर चौकशी केली असता फोन रेकॉर्ड व इतर तपशीलानंतर सरलाचे त्या तरूणाबरोबर प्रेमसंबंध असल्याचे पुढे आले होते.
पुढे वाचा, पोलिसी खाक्या दाखविताच प्रविण पोपटासारखा बोलू लागला...