आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजित पवारांच्या गाडीची बारामतीजवळ तपासणी, डिकीत अाढळले फुलांचे बुके

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अजित पवारांच्या कारच्या डिकीत फुलांचे बुके अाढळले. - Divya Marathi
अजित पवारांच्या कारच्या डिकीत फुलांचे बुके अाढळले.
बारामती -  राज्यात सुरू असलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पैशाचा गैरवापर रोखण्यासाठी  निवडणूक अायाेगाने कडक पावले उचलली अाहेत. पाेलिसांच्या विशेष पथकामार्फत ठिकठिकाणी नाकाबंदी करून सर्व वाहनांची तपासणी करण्यात येत अाहे. शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास बारामती- कळंब राज्य महामार्गावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अामदार व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गाडीचीही तपासणी करण्यात अाली. 

गुणवडी (ता. बारामती ) येथे उमेदवाराची प्रचारसभा अाटाेपून पवार पुढील सभेसाठी सांगवी गावांकडे जात असताना पाेलिसांच्या पथकाने त्यांची गाडी थांबवून तिची तपासणी केली. ‘पवारांनी तपासणीस सहकार्य केले. त्यांच्या वाहनात कोणतीही आक्षेपार्ह वस्तू वा रक्कम आढळून आली नाही,’ अशी माहिती स्थानिक भरारी पथकाच्या वतीने देण्यात अाली.
 
 
पुढील स्लाईडवर बघा, भरारी पथकाने अशी केली अजित पवारांच्या कारची तपासणी....
बातम्या आणखी आहेत...