आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ठोस निष्कर्षापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, अहोरात्र चौकशी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या तपासात ठोस पुरावे मिळवण्यासाठी गुरुवारी तपास यंत्रणांनी संशयितांचा कसून शोध घेतला. यात फार यश आले नसले तरी काही दुचाकी मालकांची चौकशी करण्यात आली असल्याचे सहायक पोलिस आयुक्त राजेंद्र भामरे यांनी सांगितले.

नागरिकांचे 60 फोन
पोलिसांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देणारे सुमारे 60 दूरध्वनी आले असून मिळालेली माहिती पडताळून पाहिली जात आहे. पोलिस पथके साता-याला दाभोलकरांच्या कुटुंबीयांशी संवाद साधून यापूर्वी त्यांना आलेल्या धमक्या व हल्ले यांची माहिती घेत आहेत.

राज्यभर तपास
दाभोलकरांचे कार्य केवळ पुण्यापुरते नव्हते. ते राज्यभर पसरले होते. त्यामुळे राज्यभर तपास केला जात आहे. मुंबईहून आलेले पथकही मोहिमेत सहकार्य करीत आहेत. मात्र अद्याप ठोस निष्कर्ष काढता येणार नाही.’
राजेंद्र भामरे, सहायक पोलिस आयुक्त