आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजकारण्यांचा दलितांच्या मतांवर डोळा : आव्हाड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बारामती - काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना आणि मनसे हे सर्व जातीयवादी पक्ष आहेत. त्यांचा फक्त दलित मतांच्या गाठोड्यावर डोळा असतो. त्यामुळे स्वातंत्र्योत्तर काळातही दलितांवरील अत्याचार थांबले नाहीत. अजूनही त्यांच्याकडे पारंपरिक दृष्टिकोनातून पाहिले जात असल्याचा आरोप मानवी हक्क अभियानचे राष्ट्रीय अध्यक्ष एकनाथ आव्हाड यांनी शनिवारी केला. जांब येथे पीडित दलित कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी आले होते.
या वेळी ते म्हणाले, पोलिसांचा तपास सुरू असला तरी अजूनही त्याला फारसा वेग आला नाही. पोलिसांच्या हालगर्जीपणाचा बळी ठरलेल्या चंद्रकांतला मरणोत्तर तरी न्याय मिळेल काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, आरोपींच्या शोधासाठी चार पथके रवाना झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.