आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे विद्यापीठात प्रदूषणमुक्त मोफत वाहनसेवा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा  ४११ एकरांचा परिसर आणि घनदाट वृक्षराजीत लपलेल्या विभागांपर्यंत विनासायास पोहोचण्यासाठी  आता प्रदूषणमुक्त वाहन उपलब्ध झाले आहे. कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या  पुढाकाराने विद्यापीठात प्रवेशद्वारापासून विविध विभागांपर्यंत बॅटरीवर चालणारे वाहन सुरू करण्यात आले आहे.   
 
ज्यांच्याकडे वाहन नाही, असे विद्यार्थी, अध्यापक आणि अन्य कर्मचाऱ्यांना त्यांच्या विभागांपर्यंत हे वाहन उपयोगी पडणार आहे. विविध विभागांतील अंतरेही अधिक आहेत. त्यामुळे  वेळ वाचावा आणि  पर्यावरणपूरक वाहतूक शक्य व्हावी, अशा हेतूने विद्यापीठात बॅटरीवर चालणारे वाहन सुरू करण्यात आले आहे. येत्या काळात अशी अजून दोन वाहने ताफ्यात दाखल होतील, अशी माहिती कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी दिली.   

वाहनाची वैशिष्ट्ये...   
- बॅटरीवर धावणारे वाहन   
- एका फेरीत सहा प्रवाशांची वाहतूक क्षमता   
- एका चार्जिंगसाठी बॅटरीला लागतात ८ तास   
- एका चार्जिंगवर वाहन धावते ४० ते ६० किमी   
- विद्यापीठ प्रवेशद्वारापासून विविध विद्याशाखांपर्यंत सेवा   
- सकाळी ९.३० ते सायंकाळी ५ या वेळात आठ फेऱ्या   

महिलांसाठी सेवा सुरू करणार  
काही वर्षांपूर्वी अशा उपक्रमाची घोषणा झाली होती, मात्र आता कार्यवाही सुरू केली आहे. विद्यार्थी, अध्यापक आणि विद्यापीठाचा कर्मचारीवर्ग यांच्यासाठी  ही वाहनसेवा मोफत असेल. नजीकच्या काळात फक्त महिलांसाठी  अशी वाहनसेवा विद्यापीठात सुरू करण्याचा मानस आहे. 
- डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
बातम्या आणखी आहेत...