आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

"सॉफ्ट स्किल'मुळे नोकरीची गॅरंटी; ‘पॉलिटेक्निक’चा उपक्रम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - तंत्रशिक्षण पदविकेचे शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण होताच नोकरीची हमी मिळावी, या दृष्टिकोनातून सॉफ्ट स्किल कोर्स सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पदविका प्राप्त होताच नोकरीचीही हमखास संधी मिळणार आहे.

पाठ्यपुस्तकांतील अभ्यासक्रम आणि प्रत्यक्ष उद्योजकता किंवा फील्ड वर्क यांचा काहीच संबंध नसल्याने पदवी, पदविका मिळवणारे विद्यार्थी नोकरीच्या ठिकाणी मात्र मागे पडतात. हे दृश्य बदलण्यासाठी तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक) नेच पुढाकार घेतला आहे. उद्योगांच्या नेमक्या गरजा लक्षात घेऊन ‘सॉफ्ट स्किल कोर्स’ तयार करण्यात आला आहे. तो पूर्ण केल्यावर विद्यार्थ्यांना नोकरीमधील अडथळे सहज दूर करणे शक्य होईल.

यासंदर्भात तंत्रशिक्षणचे राज्य सहसंचालक दयानंद मेश्राम म्हणाले, ‘पॉलिटेक्निकचे विद्यार्थी तीन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करतात; पण उद्योगांना प्रत्यक्षात लागणारे सॉफ्ट स्किल्स अभ्यासक्रमात नसतात. त्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांना नोकरी मिळण्यात अडचणी येतात. हातात पॉलिटेक्निकची पदवी वा पदविका, पण नोकरी नाही, असे चित्र दिसते. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने उद्योगांना अपेक्षित कौशल्याचे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावे, यासाठी नामांकित उद्योगांशी करार केले आहेत, असेही त्यांनी या वेळी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...