पुणे- टीव्ही रियालिटी शो बिग बॉस-5 मध्ये सहभागी झालेली मॉडेल व व्हिडिओ जॉकी पूजा मिश्राने बॉलिवूड एक्ट्रेस ईशा कोप्पीकरचा पती टिम्मी नारंग आणि त्याच्या भावावर शारीरिक व मानसिक त्रास दिल्याचा आरोप केला आहे. पूजाच्या आरोपांनुसार, टिम्मी ऊर्फ रोहित आणि त्याचा भाऊ राहुल नारंगने तिचे शारीरिक शोषण करण्याचा प्रयत्न केला. राहुल पूजाचा मेहुणाही आहे. याबाबत पूजाने पुण्यातील मुंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पूजा मिश्राने बॉलिवूडमध्ये अनेक आयटम सॉंगमध्ये काम केले आहे. याचबरोबर बिग स्विच आणि यूटीव्ही बिंदास सारख्या टीव्ही रियालिटी शोमध्ये तिने आपला जलवा दाखवला आहे.
काय आहे आरोप- पूजाने या नातेवाईक असलेल्या दोघा भावांवर आरोप केला आहे की, दोघे भावांनी सर्वप्रथम तिचे मुंबईतील घरी शोषण करण्याचा प्रयत्न केला. तसेच पुण्यातील एका हॉटेलात थांबल्यानंतर तेथेही माझे शारीरिक व मानसिळ छळ करण्याचा प्रयत्न झाला. मात्र मी तेथून कशी तरी माझी सुटका करून घेतली व मुंबईला निघून आली. माझ्या जिवाला त्यांच्यापासून धोका असल्याने मी मुंबईतील फ्लॅट सोडून एका अज्ञात स्थळी राहत आहे.
सोशल अकाउंट हॅक केल्याचा आरोप- पूजाने आरोप केला आहे की, उद्योगपती टिम्मी नारंग आणि राहुल नारंग गेल्या काही दिवसापासून माझ्या मागे लागले आहेत. त्यांनी मला धमक्या दिल्या आहेत तसेच माझ्यावर त्यांचे लोक पाळत ठेवत आहेत. माझे सोशल मिडिया अकाऊंट हॅक करून तेथून माझी माहिती घेण्याचा व पाठलाग करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
(छायाचित्र : मॉडेल पूजा मिश्रा (डावीकडे), अभिनेत्री ईशा कोप्पीकर आपल्या टिम्मी नारंग पतीसमवेत.)