आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे: कचरा वेचणाऱ्या मुलाने परिस्थितीवर मात करून 76.20 % गुण मिळवले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पिंपरी चिंचवड: हालाकीची परस्थिती असताना देखील हार न मानता पिंपरी चिंचवडमध्ये एका विद्यार्थ्याने 10 वीच्या परीक्षेत चांगल्या गुणाने यश संपादन केले आहे. एकीकडे कचरा वेचणारी आई आणि दुसरीकडे वडिलांची छत्रछाया नसताना देखील यशाच्या शिखराच पहिलं पाऊल या विद्यार्थ्याने टाकले आहे. 
 
पिंपरी चिंचवडमधील गांधीनगर झोपडपट्टीत राहणाऱ्या ओंकार अशोक चव्हाण या विद्यार्थ्याने कचरा वेचून अभ्यास करायचा या त्याच्या गुणवत्तेला पाहून परिसरातील नागरिकांनी त्याचे कौतुक केले आहे. ओंकार हा गरीबीवर मात करत 10 वीच्या परीक्षेत 76.20 टक्के गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. ओंकारच्या वडिलांचं 2013 मध्ये निधन झाले आहे. संसाराचा गाडा ओढण्यासाठी ओंकारची आई शहरामध्ये स्वच्छता करत असते. तर पिंपरी चिंचवडमधील जुनी सांगवी परिसरात घंटा गाडीवरसुध्दा काम करून देखील मुलाला शिक्षणासाठी वंचित न ठेवता त्याला शिक्षणासाठी प्रोत्साहन देत असते. त्यातच ओंकारने देखील आपली जिद्द आणि मेहनतीने दिवस-रात्र अभ्यास करत आईच्या स्वप्नांना खरे केले आहे. ओंकारला पुढचं शिक्षण हे विज्ञान क्षेत्रात करायचं आहे. आणि भविष्यात ओंकारला एक यशस्वी अभियंता होण्याचं स्वप्न त्याने उराशी बाळगून ठेवलं आहे.