आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Poor Woman Gilve One Lakh For Tempale Construction In Pune

भिकारणीने मंदिरासाठी दिले एक लाखाचे दान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - अंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव येथील भिकारी महिलेने राम मंदिराच्या बांधकामासाठी लक्ष्मी पोखरकर(85) या भीक मागणार्‍या महिलेने एक लाख रुपयांचे दान दिले आहे. या महिलेच्या पतीचे 15 वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यानंतर तिने भीक मागणे सुरू केले. भीक म्हणून मिळालेली रक्कम ती बँकेत जमा करत होती.

या गावाच्या जिल्हा परिषद सदस्या माथाजी पोखरकर यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी गावात राम मंदिर बांधण्यासाठी बैठक झाली. या बैठकीस लक्ष्मीबाईही उपस्थित होती. तिने मंदिरासाठी 1 लाख रुपये दान देण्याची इच्छा व्यक्त केली. एवढेच नव्हे तर घरी जाऊन 50 हजार रुपये तिने आणून दिले. तसेच गेल्या आठवड्यात तिने उरलेले 50 हजारही दान दिले. यानंतर ग्रामस्थांनी लक्ष्मीला भीक मागणे थांबवण्याची विनंती केली. त्यांनी तिच्या भोजनाची व्यवस्था केली आहे. आपल्याला कसलीही अपेक्षा नव्हती. 15 वष्रे भीक मागून जे कमवले ते चांगल्या कामासाठी दान दिल्याचे लक्ष्मीबाईने सांगितले.