आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणी प्रश्नांवरून अजित पवारांविरोधात आंदोलन केलेले देशमुख महायुतीतून बाहेर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- महाराष्ट्र जनहित शेतकरी संघटनेने 20 दिवसांपूर्वी महायुतीकडे बारामती सोलापुरातील कोणत्याही एका जागेची मागणी केली होती. महायुतीच्या एकाही वरिष्ठाने याची दखल घेतली नाही अथवा निरोपही दिला नाही. त्यामुळे जनहित शेतकरी संघटना महायुतीतून बाहेर पडली आहे. याला प्रत्त्युतर म्हणून जिल्ह्यातील विधानसभेच्या पाच जागा लढणार असल्याची माहिती संस्थापक-अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी दिली आहे. उजनी धरणातून सोलापूर जिल्ह्यात पाणी सोडावे यासाठी देशमुख यांनी आंदोलन केले होते. त्यावेळी अजित पवार यांनी धरणावरून केलेले वक्तव्य भलतेच वादग्रस्त ठरले होते.

देशमुख म्हणाले, महायुतीकडे बारामतीतून अजित पवार यांच्या विरोधात जिल्ह्यातून एक जागा मागितली होती. देवेंद्र फडणवीस, रामदास आठवले, महादेव जानकर, शिवसेना नेते दिवाकर रावते, सदाभाऊ खोत या नेत्यांना मुंबई येथे भेटून मागणी केली होती. परंतु महायुतीच्या नेत्यांनी याची दखल घेतली नाही. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांसाठी जनहित शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी रात्रंदिवस फिरले, महायुतीला याचे काडीमात्र देणे नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

सोलापुर जिल्ह्यातील 5 जागा लढवणार- मोहोळ, दक्षिण सोलापूर, मंगळवेढा, माढा, उत्तर सोलापूर या पाच मतदार संघातून सोबत येणाऱ्या पक्षाला, सामाजिक संघटनांना स्थान देण्यात येईल. 22 सप्टेंबर रोजी 10 वाजता इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. महिलांना प्राधान्य देणार असून 23 सप्टेंबरला त्यांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत असेही देशमुख यांनी सांगितले.