आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्‍याच्‍या महापौरपदी राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप यांची निवड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - पुण्याच्या महापौरपदी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक प्रशांत जगताप यांची निवड झाली. महापौरपदासाठी घेण्‍यात आलेल्‍या निवडणुकीत जगताप यांना 84 मते मिळाली. त्यांच्या विरोधात उभे असलेले भाजपाचे नगरसेवक अशोक येनपुरे यांना 25 मते मिळाली.
- महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेने ऐनवेळी या निवडणुकीतून माघार घेतली व तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला.
- शिवसेनेचे उमेदवार सचिन भगत यांना त्यांच्या पक्षाची 12 मते मिळाली.
- महापौर दत्तात्रय धनकवडे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राजीनामा देण्यास सांगितल्यामुळे त्यांनी या पदाचा राजीनामा दिला होता.
- मनपाच्‍या सत्तेत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसची आघाडी आहे.
- महापौरपदासाठी राष्ट्रवादीने जगताप यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला होता.
-उपमहापौरपदी काँग्रेसचे मुकारी अलगुडे यांची निवड झाली आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, जल्‍लोषाचा फोटो..