आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Preparedness Of Ashadi : 22 New Dindya Participating In Tukobaray Palkhi

तयारी आषाढीची: तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यात 22 नव्या दिंड्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - भक्तिरसाची परंपरा पुढे नेणा-या वारी सोहळ्यात संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात या वर्षी 22 नव्या दिंड्या सहभागी होणार आहेत. एकूण 321 दिंड्यांसह तुकोबांच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान 30 जून रोजी देहू गावातून होणार आहे. यंदा प्रथमच राज्याबाहेरील तीन दिंड्या वारीत सहभागी होत आहेत. पालखी सोहळाप्रमुख अशोक मोरे यांनी ही माहिती दिली. तुकोबांच्या पालखी रथाच्या पुढे 26, तर मागाहून 295 दिंड्या वाटचाल करतील.
कर्नाटकातील तीन दिंड्या
यंदा पालखी सोहळ्यात कर्नाटकातील तीन दिंड्यांचा समावेश आहे. गीता भागवत दिंडी, बेलूर, बापूदेव देवस्थान बोळेगाव प्रासादिक दिंडी, बिदर आणि जय जय रामकृष्ण हरी प्रासादिक दिंडी, बेळगाव या दिंड्या प्रथमच सहभागी होणार आहेत.


वीणेकरी, टाळकरीही महिलाच
पिंपरी येथील संत बहिणाबाई महिला दिंडी चिंचवड येथील संत जिजाबाई प्रासादिक दिंडीमधील वीणेकरी व टाळकरीही महिलाच आहेत, हे या पालखी सोहळ्याचे एक वैशिष्ट्य आहे.
निवृत्तीनाथांच्या पालखीचे प्रस्थान.


बीड, परभणी येथील दिंड्या
० बारडेश्वर प्रासादिक दिंडी,
ता. कर्जत, जिल्हा अहमदनगर
० जनार्दन महाराज ढवळीकर दस्तापूरकर दिंडी, गोविंदपूर, जिल्हा परभणी
० श्री पावनधाम दिंडी, तालुका केज, जिल्हा बीड,
० कल्याणस्वामी प्रासादिक दिंडी, चकलांबा,
ता. गेवराई, जिल्हा बीड
० पुणे जिल्ह्यातील शिरूर, बारामती, दौंड, इंदापूर, खेड, उरुळीकांचनच्या 22 नव्या दिंड्या आहेत.