आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Primary Education News In Marathi, Reserve Seat, Divya Marathi

पूर्व प्राथमिक व पहिलीच्या राखीव जागांसाठी सोमवारपासून परीक्षा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - मोफत शिक्षण अधिकारांतर्गत पूर्व प्राथमिक व पहिलीच्या राखीव जागांची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया 24 मार्चपासून सुरू होणार आहे. आर्थिक दुर्बल घटकांसाठीच्या राखीव 25 टक्के जागांसाठी ही प्रक्रिया होईल, अशी माहिती प्राथमिकचे शिक्षण संचालक महावीर माने यांनी येथे दिली.


ज्यांचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय, विशेष मागास प्रवर्ग, खुला प्रवर्ग व धार्मिक अल्पसंख्याक (मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन, पारसी, जैन, शीख) या गटांसाठी ही प्रवेश प्रक्रिया असेल, असे माने यांनी स्पष्ट केले.


प्रवेश अर्ज 24 मार्चपासून भरण्यास प्रारंभ होईल, तर प्रत्यक्ष प्रवेश एप्रिलमध्ये होतील. 24 ते 29 मार्चदरम्यान मंडळाच्या संकेतस्थळावर अर्ज भरता येतील. ठिकठिकाणी मदत केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. या केंद्रांवर प्रवेश प्रक्रियेची सर्व माहिती उपलब्ध असेल. प्रवेश अर्ज भरणे, आवश्यक कागदपत्रे, प्रवेशाची माहिती दिली जाईल. अर्जही तिथेच स्वीकारले जातील, असे माने यांनी स्पष्ट केले.


अनुदानित शाळांना परीक्षा
अनुदानित, विनाअनुदानित, स्वयं अर्थसहायित शाळा, राज्य मंडळाच्या शाळा, सीबीएसई, आयसीएसई व आयबी या सर्व शाळांमधील जागांसाठी ही प्रवेश प्रक्रिया असेल. शाळेपासून तीन किलोमीटर परिसरात राहणारे रहिवासीच यासाठी अर्ज करू शकतील, अशी माहिती महावीर माने यांनी दिली.


सोडत पद्धतीने प्रवेश
शाळांच्या प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त संख्येने अर्ज आल्यास सोडत पद्धतीने प्रवेश दिले जातील. जिल्ह्यांतील मनपा, जिल्हा परिषद, तालुका स्तरावर प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता ठेवली जाईल.
महावीर माने, शिक्षण संचालक, प्राथमिक