आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिंपरी चिंचवडमध्ये \'बीव्हीजी\' कचऱ्याचा घोटाळा उघड, कचरा नेणाऱ्या ट्रक मध्ये वजनासाठी भरली जातेय माती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पिंपरी चिंचवड : गल्लीपासून दिल्लीपर्यंतची शासकीय कार्यालय आणि शहराची स्वच्छता करण्याच कंत्राट घेणाऱ्या नामांकित बीव्हीजी कंपनीचा भ्रष्टाचार पिंपरी चिंचवडमध्ये समोर आलाय. शहरातील कचरा वजनावर उचलण्याचं कंत्राट बीव्हीजीने महापालिकेकडून घेतले आहे. मात्र वजन जास्त दाखवून कचऱ्यातून अधिकाधिक पैसा उकळण्यासाठी, बीव्हीजीने कचरा उचलणाऱ्या ट्रकमध्ये खाली वाळू आणि वर कचरा भरण्याचा पराक्रम केला आहे.
 
निगडी येथील प्रभाग क्रमांक 23 मध्ये ट्रकमध्ये वर कचरा आणि खाली वाळू घेऊन जात असताना हा नगरसेविका कमल घोलप यांनी ट्रक पकडला तेव्हा हा सर्व प्रकार समोर आला आहे. हा ट्रक थेट पालिकेच्या आवारात आणत ठेकेदारांवर कारवाई करावी अशी मागणी नगरसेविकेने केली आहे. विशेष म्हणजे अशा प्रकारे ट्रक मधून मोशी येथील कचरा डेपोमध्ये नेतात त्याचे मोजमाप केले जाते. त्यामुळे यांच्यातून घोटाळा होत असल्याचा आरोप नगरसेविका यांनी केला आहे. एक टन कचरा उतरवल्यानंतर बीव्हीजीला ७६४ रुपये मिळतात. शहरातून रोज जवळपास ८५ टन कचरा उचलला जातो, यासाठी पालिका ६५ हजार रुपये मोजते. मात्र ट्रकमध्ये ७० टक्के वाळूच असते. त्यामुळं रोज हजारो आणि महिन्याला लाखो रुपयांचा यातून घोटाळा होत असण्याची शक्यता वर्तवली जातीये. बीव्हीजीचा हा गोलमाल भाजप नगरसेविका कमल घोलप आणि नगरसेवक उत्तम केंदळे यांनी समोर आणलाय. याप्रकरणी महापालिका प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली आहे. जाणीव पूर्वक ट्रकमध्ये माती, राडारोडा आणि वाळू भरलेली असेल तर आम्ही पंचनामा केला आहे. संबंधित कंपनीवर आणि ठेकेदारावर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन सहा. आयुक्त मिनीनाथ दंडवते यांनी दिले आहे.
 
 
बातम्या आणखी आहेत...