आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येरवडा तुरुंगातील कैद्यांचे उपाेषण; पॅरोलची रजा मिळणार नसल्याच्या निर्णयाला विरोध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- बलात्कार,खून अशा गंभीर प्रकरणांत शिक्षा झालेल्या कैद्यांना यापुढे पॅरोल आणि फर्लोची रजा मिळणार नसल्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला अाहे. त्याविराेधात येरवडा कारागृहातील शंभरावर कैद्यांनी उपाेषण सुरू केले. दरम्यान, तुरुंग प्रशासनाने या कैद्यांची समजूत घालून त्यांना अांदाेलन मागे घेण्यास लावले असले तरी अद्यापही काही कैदी उपोषणावर ठाम आहेत.

गंभीर गुन्ह्यांत पॅरोल अथवा फर्लो मिळाल्यानंतर दोनशे कैदी फरारी झाल्याचे समोर अाल्यानंतर राज्य सरकारने हा निर्णय घेतला हाेता. मात्र काही अपवादात्मक बाबीत अशी रजा मंजूर करण्याची तरतूदही सरकारने केली हाेती. मात्र सरसकट सर्वच कैद्यांना यापुढे पॅरोल आणि फर्लोची सुटी मिळणार नसल्याचा गैरसमज करत या कैद्यांनी साेमवारपासून उपाेषण सुरू केल्याची माहिती अाहे. याबाबत येरवडा कारागृहाचे अधीक्षक यू.टी. पवार यांनी सांगितले की, ‘कैद्यांचा गैरसमज दूर झाला असून त्यांनी उपाेषण मागे घेतले अाहे. त्यांच्या मागण्या सरकारपर्यंत पाेहाेचवणार अाहाेत.’
दरम्यान, फर्लो आणि पॅरोल सुटी ही अनुक्रमे २८ आणि ९० दिवसांचीच ठेवावी. तसेच, जे कैदी पॅरोल रजेवर बाहेर जाऊन परत आले आहेत, त्यांना रजा देण्यात यावी, अादी मागण्यांचे निवेदन कैद्यांना प्रशासनाला दिले अाहे.
बातम्या आणखी आहेत...