आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येरवडा कारागृहात कैद्याचा मृत्यू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याचा हृदयविकाराचा झटका आल्याने रविवारी येरवडा तुरुंगात मृत्यू झाला. अजित ऊर्फ आत्माराम तायडे (38) असे मृत कैद्याचे नाव आहे. 27 ऑगस्ट 2012 पासून तो खुनाच्या गुन्ह्यात येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता. रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने कारागृहाच्या डॉक्टरांनी त्याची तपासणी केली. त्यानंतर त्याला ससून रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. येरवडा पोलिस चौकीत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.