आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय विश्लेषक व विचारवंत डॉ. यशवंत सुमंत यांचे निधन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख आणि विचारवंत प्रा. डॉ. यशवंत सुमंत यांचे शनिवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने पुण्यात निधन झाले. ते 58 वर्षाचे होते. त्यांच्या मागे पत्नी व दोन मुले आहेत.
डॉ. सुमंत गेल्या काही दिवसापासून आजारी होते. गुरुवारी रात्री त्यांची प्रकृती खालावल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच वेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना रुग्णालयात दाखल करत असतानाच त्यांच्या हृदयाचे कार्य बंद झाले होते. मात्र, तातडीने उपचार करून त्यांच्या हृदयाचे कार्य सुरू करण्यात आले. त्याच वेळी मेंदूला होणारा रक्तपुरवठा थांबला. अखेर आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
राज्यशास्त्राचे गाढे अभ्यासक, गांधी विचार आणि आजची परिस्थिती या संदर्भात मांडणी करणारे विचारवंत अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या विचारांमध्ये आणि कृतीत जराही अंतर नव्हते. इझम म्हणजे काय, जातवाद, जमातवाद, स्त्रीवादाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि वर्तमान काळातील सामाजिक प्रश्नांवर ते परखडपणे आपले विचार मांडत.