आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Programme Of Pakistani Artist Canceled Due To Shivsena's Oppose

पाकिस्तानी कलाकारांचा पुण्यातील कार्यक्रम रद्द, शिवसेनेच्या विराेधामुळे अायाेजकांचा निर्णय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - अमनाेरा पार्क येथे २५ एप्रिल राेजी अायाेजित पाकिस्तानी कलाकार अातिफ अस्लम याचा गायनाचा कार्यक्रम शिवसेनेच्या विराेधामुळे अायाेजकांना रद्द करावा लागला.

अंजेनय साठे मित्रमंडळातर्फे या कार्यक्रमाचे अायाेजन करण्यात अाले हाेते. मात्र शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तानी कलाकारांचा कार्यक्रम हाेऊ देणार नाही, अशी भूमिका घेत या कार्यक्रमाला परवानगी नाकारावी, या मागणीचे निवेदन पाेलिस अायुक्तांना दिले हाेते. अायाेजक अंजेनय साठे म्हणाले, ‘रसिकांना दर्जेदार कार्यक्रमाचा अास्वाद मिळण्यासाठी अाम्ही या कार्यक्रमाचे अायाेजन केले हाेते. मात्र शिवसेनेचा विराेध व लाेकभावना लक्षात घेऊन हा कार्यक्रम रद्द करण्याचा कडवट निर्णय अाम्हाला घ्यावा लागला. एखाद्या कलेस काेणत्याही प्रांताचे अडथळे येऊ नयेत ही अामची भूमिका अाहे.’

शाेले ४० वर्षांनी कसा लागताे?
युवा सेनेचे शहर अध्यक्ष किरण साळी म्हणाले, ‘भारतीय सैनिकांना पाकिस्तानी लाेक मारत असताना त्यांच्या कलाकारांचे कार्यक्रम अाम्ही कदापि खपवून घेणार नाही. या कलाकारांनी त्यांच्या देशातील तरुणांना दहशतवादाकडे न वळता चांगले नागरिक बनण्याचा संदेश दिला पाहिजे. "शाेले' चित्रपट पाकिस्तानात प्रदर्शित हाेण्यास ४० वर्षांचा प्रदीर्घ कालावधी लागताे ही शरमेची बाब अाहे.’