आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Protect Againest Shripal Sabnis In Pimpri chincwad

सबनीसांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची गाढवावरून धिंड; संमेलनस्थळी पुतळ्याचे दहन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पिंपरी-चिंचवड येथे होणा-या साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अवमानकारक वक्त्यव्य केल्याच्या निषेधार्थ आज खासदार अमर साबळे यांच्या नेतृत्वाखाली संत तुकाराम नगर येथे भाजपने आंदोलन केले. सबनीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची गाढवावरून धिंड काढत साहित्य संमेलनाच्या स्थळावर त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून नंतर त्याचे दहन करण्यात आले. सबनीस जोपर्यंत माफी मागणार नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असुन माफी मागितल्याशिवाय संमेलनात त्यांना पाय ठेऊ देणार नसल्याचा इशारा खासदार साबळे पुन्हा एकदा दिला.
पिंपरीतील संत तुकारामनगर येथून साहित्य संमेलनाचे स्थळ असलेल्या एच.ए च्या मैदानावरील संमेलनाच्या नियोजित व्यासपीठापर्यंत श्रीपाल सबनीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची गाढवावरून धिंड काढून आंदोलन करण्यात आले. खासदार अमर साबळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनाला शहराध्यक्ष सदशिव खाडे, युवा मोर्चा अध्यक्ष मोरेश्वर शेडगे, महिला मोर्चा अध्यक्ष शैला मोळक, विध्यार्थी आघाडीच्या अध्यक्ष वेणूताई साबळे, उमाई खापरे, वीणाई सोनवलकर, राजू दुर्गे तसेच इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सबनीस यांच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या. अरे या सबनीसचं करायच काय, खाली डोके वर पाय, नरेंद्र मोदी तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणा दिल्या गेल्या.
यावेळी साबळे म्हणाले, सबनीस हे स्वतःच गाढव आहेत. त्यांना विवेक नाही. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवडून आल्यानंतरही त्यांना शहाणपण आल्याचे दिसत नाही. त्यांचे वक्त्यव्य संस्कृतीला धरून नाही. नरेंद्र मोदी यांचा गौरव करत असल्याचे ते आत्ता सांगत असले तरी त्यांचे म्हणणे बरोबर नाही. ते कोलांट्या उड्या घेत असुन शब्दाचा खेळ करत आहेत. ते माफी मागत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असुन पहिल्या टप्प्यात त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची गाढवावरून धिंड काढून संमेलनस्थळी त्यांचा प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले आहे. त्यांनी माफी मागितली नाही तर त्यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढून आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे. आमचा साहित्य संमेलनाला विरोध नाही. मात्र सबनीस यांच्या वक्त्यावावर आक्षेप आहे. महाबळेश्वर येथे झालेल्या संमेलनाचे अध्यक्ष आनंद यादव यांनी संत तुकाराम महाराज यांच्या बद्दल त्यांच्या पुस्तकात आक्षेपार्ह लिखाण केले होते. त्यावेळीही असाच वाद उभा राहिला होता. मात्र त्यावेळी यादव यांच्याशिवाय संमेलन झाले होते. त्यामुळे सबनीस यांनीही माफी मागावी अन्यथा त्यांना संमेलनात पाय ठेऊ देणार नाही.
पुढे पाहा, श्रीपाल सबनीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची गाढवावरून काढलेल्या धिंडेची छायाचित्रे....