आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एफटीआयआयचे विद्यार्थी हिंदूविरोधी, संघाच्या "ऑर्गनायझर' मुखपत्रातून आरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) मधील आंदोलन हा सुनियोजित कट आहे आणि येथील विद्यार्थी हिंदूविरोधी आहेत, असा आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘ऑर्गनायझर’ या मुखपत्रात करण्यात आला आहे. या निमित्ताने संघपरिवारानेही एफटीआयआयच्या आंदोलनात उडी घेतल्याची चर्चा सुरू झाली आहे.

एफटीआयआयमधील विद्यार्थ्यांचे आंदोलन गेला महिनाभर सुरू आहे. गजेंद्र चौहान यांची संस्थेच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती विद्यार्थ्यांना मान्य नाही. चौहान हे संघ आणि भाजप परिवारातले असल्याने केंद्र सरकार स्वायत्त संस्थांमध्येही स्वत:च्या विचारांशी बांधिलकी मानणाऱ्या व्यक्तींची जाणीवपूर्वक नेमणूक करत आहे. तसेच चौहान यांचे चित्रपटविषयक योगदान काय आहे, असा प्रश्न विद्यार्थ्यांनी केला आहे. तसेच नियामक मंडळावरील अन्य सदस्यांच्या नेमणुकीलाही विद्यार्थ्यांचा विरोध आहे. या पार्श्वभूमीवर संघाच्या मुखपत्रातूल लेखातून विद्यार्थी हिंदूविरोधी असल्याचा आरोप करण्यात आला आहे तसेच चौहान यांची भलावणही करण्यात आली आहे.

एफटीआयआय संस्थेला आज सुट्टी असल्याने नवे संचालक प्रशांत पाठराबे याबाबत प्रतिक्रियेसाठी उपलब्ध होऊ शकले नाहीत. मात्र विद्यार्थ्यांनी याविषयी संताप व्यक्त केला. आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धारही व्यक्त केला.
बातम्या आणखी आहेत...