आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळत्या चितेत उडी मारल्याने पुण्यात एकाचा मृत्यू, शरीराची झाली राख

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पुण्यातील धनकवडी गावातील स्मशानभूमीत आज दुपारी अडीचच्या सुमारास एका मनोरूग्णाने जळत्या चितेच उडी मारल्याने मृत्यू झाला. केरबा गोविंद चव्हाण (वय 55) असे मृताचे नाव असल्याचे समजते.
आज दुपारी धनकवडी स्मशानभूमीत मृत्यू झालेल्या एका व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यात येत होते. चितेला आग लावल्यानंतर काही वेळाने चव्हाण याने चितेजवळ गेला व काही कळायच्या आतच त्यान जळत्या चितेत उडी घेतली. त्याला वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र आग मोठी होती. त्यामुळे चव्हाणला बाहेर काढण्यात यश आले नाही. त्यामुळे काही मिनिटांतच चव्हाणचे शरीर जळून खाक झाले व त्याची राख झाली.
चव्हाण यांच्या कुटुंबियांनी सांगितले की, ते मनोरूग्ण होते. कधी कधी ते चांगले वागायचे अधून-मधून त्यांना वेडाचे झटके यायचे. या काळात ते काहीही करायचे. आताही अशाच वेडेपणाच्या झटक्यात उडी मारली असावी.