आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Psycho Patient Jumped In Fire At Pune, Patient Died

पुण्यात जळत्या चितेत मनोरुग्णाने उडी, 100 टक्के भाजल्याने मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - पुण्यातील धनकवडी येथील स्मशानभूमीत बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास एका मनोरुग्णाने जळत्या चितेत उडी घेतल्याने स्मशानभूमीत एकच खळबळ उडाली. या घटनेत 100 टक्के भाजल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. केरबा गोविंद चव्हाण (55) असे मृताचे नाव आहे.
बालाजीनगर येथील मुकुंद परदेशी यांचा अंत्यसंस्कार बुधवारी दुपारी धनकवडी स्मशानभूमीत सुरू होता. त्यावेळी अचानकपणे त्याठिकाणी आलेल्या केरबाने जळत्या चितेत उडी घेतली. त्यामुळे घटनास्थळी उपस्थितीत असलेल्या परदेशींच्या नातेवाइक आणि मित्र परिवारात एकच खळबळ उडाली. यानंतर तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी या घटनेची माहिती अग्निशामक दलाच्या जवानांना दिली. काही वेळातच जवानांनी केरबाला बाहेर काढले. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. केरबा चव्हाण हा लष्कर (कॅम्प) भागातील पाणीपुरवठा विभागात कामास होता. या प्रकरणी बिबवेवाडी पोलिस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.