आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्येष्ठ समाजशास्त्रज्ञ वसुधा धागमवार यांचे निधन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- कायदेविषयक सखोल संशोधन आणि ज्ञानाच्या आधाराने स्त्री चळवळ, कामगार आणि विस्थापितांचे संघर्ष सातत्याने मांडणार्‍या ज्येष्ठ समाजशास्त्रज्ञ वसुधा धागमवार (वय 74) यांचे निधन झाले. ज्येष्ठ लेखिका गीता साने यांच्या त्या कन्या होत. त्या अविवाहित होत्या. धागमवार यांनी केंब्रीज विद्यापीठातून कायदेविषयक डॉक्टरेट संपादन केली होती. स्त्रियांच्या प्रश्नांसंदर्भात कायदे कसे उपयुक्त ठरू शकतील, याचे मार्गदर्शन करणार्‍या पुस्तिका त्यांनी सर्व भाषांत उपलब्ध केल्या होत्या. पुणे विद्यापीठात त्यांनी अध्यापनही केले होते.

दिल्ली येथे त्यांनी ‘मार्ग’ची (मल्टिपल अँक्शन रिसर्च ग्रुप) स्थापना करून स्त्रीप्रश्नांवर दीर्घकाळ काम केले.