आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशात असहिष्णुता दिसत नाही : पं. हरिप्रसाद चौरसिया

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - आपल्या देशात असहिष्णुता आहे, असे मला अजिबात वाटत नाही. ज्यांना तसे वाटते त्यांना वाटू देत. पण मला मात्र गेल्या ७० वर्षांत कधीही असा अनुभव आला नाही. मी खूप आनंदी पद्धतीने माझे आयुष्य जगलो. देशातील वातावरण चांगले आहे, असे मला तरी वाटते,अशा शब्दांत ज्येष्ठ बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया यांनी सध्या चर्चेत असलेला असहिष्णुतेचा मुद्दा खोडून काढला.

गानसरस्वती संगीत महोत्सवाची सांगता झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ‘आपल्या देशातील  लोक आणि वातावरण चांगले आहे. पण आपल्यातील काही जण वाईट बोलत असतात. त्यातूनच असहिष्णुतेची चर्चा सुरू झाली आहे. जे या विषयावर बोलतात, ते त्यांच्या विचारांनी...असेही ते म्हणाले.

मुंबईत सरकारने दिलेल्या भूखंडाबाबत माझ्यावर केल्या गेलेल्या वक्तव्यांनी मी व्यथित झालो. सरकारने दिलेल्या जागेत मी ‘वृंदावन’ नावाचे गुरूकुल चालवतो. त्या जागेचा कुठलाही व्यावसायिक वापर केला जात नाही. पुरेशी माहिती न घेताच बिनबुडाचे आरोप केल्याने मला दु:ख झाले, असे त्यांनी सांगितले. सिलसिला, लम्हे, चांदनी, फासले, विजय, परंपरा, साहिबा आणि डर हे शिवहरींच्या संगीताने गाजलेले चित्रपट होते. उत्तम शब्द मिळाले तर कामाला मजा येते. सध्या तशी परिस्थिती उरलेली नाही. पण एखादा उत्तम संगीतप्रधान चित्रपट मिळाला आणि शिवहरी एकत्र यावेत, ही नियतीची इच्छा असेल तर तसे नक्की घडले, असेही ते म्हणाले.

संगीताने उत्तम श्रोता घडतो
शिव-हरी जोडीचे (पं. शिवकुमार शर्मा आणि पं. हरिप्रसाद चौरसिया) संगीत लाभलेले गाजलेले चित्रपट अनेक आहेत. पुन्हा शिवहरींचे संगीत ऐकायला मिळेल का, या प्रश्नावर संधी मिळाली तर पुन्हा एकत्र येऊ, असे उत्तर हरिप्रसादजी यांनी दिले. शास्त्रीय संगीताप्रमाणेच हिंदी चित्रपट संगीताचेही स्वतंत्र स्थान आहे. त्या संगीतानेही उत्तम श्रोता घडवला आहे. त्यामुळे संधी मिळाल्यास पुन्हा एकत्र काम करायला नक्कीच आवडेल, असे हरिप्रसादजी म्हणाले.