आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घुमानला जाण्यास प्रकाशकही तयार, संमेलनावर बहिष्कार मागे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - पंजाबमधील घुमानला मराठी वाचक नाहीत, हे कारण देऊन साहित्य संमेलनावर एकमताने बहिष्कार घालणा-या मराठी प्रकाशक परिषदेने मंगळवारी विरोध मागे घेण्याचा निर्णय घेतला. प्रकाशक आणि महामंडळातील वादावर सकारात्मक तोडगा दृष्टीपथात आहे. येत्या २८ रोजी हैदराबाद येथे होणा-या महामंडळ कार्यकारिणीच्या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाईल, असे परिषदेचे कार्याध्यक्ष अरुण जाखडे व महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी सांगितले.

परिषद आणि महामंडळाची मंगळवारी बैठक झाली. त्यात परिषदेने मागण्यांचे पत्र महामंडळाला दिले.

काय आहेत मागण्या
*यापुढे जिथे दहा ते वीस मराठी कुटुंबे आहेत, अशाच ठिकाणी संमेलन घ्यावे.
*पुस्तकविक्रीचा आग्रह नाही, पण मराठी वातावरण असावे
*संमेलन संयोजक त्या जिल्ह्यातलाच असावा.
*ग्रंथप्रदर्शनातील स्थळनिवड, असुविधा, गैरसोयींविषयी पूर्वसूचना देऊन, त्यांचे निराकरण करावे.
*परस्परांचा सन्मान अबाधित राहील, याचे भान कुठलीही वक्तव्ये करताना सांभाळावे.